Ayodhya Ram Mandir Opening Ceremony: आज संपूर्ण देशातील राम भक्तांचे लक्ष अयोध्येकडे लागलं आहे. श्री रामाची पहिली झलक पाहून आज सर्वांचे मन तृप्त झालं आहे. कारण लाखो भाविकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आज संपली आहे. या खास सोहळ्याच्या निमित्त्याने अनेक रामभक्त जवळच्या मंदिरात जाऊन भजन गात, तर काही जण खास कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. यादरम्यान उत्तर प्रदेश मधील पोलीस पथकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; ज्यामध्ये संपूर्ण टीम खास सादरीकरण करताना दिसली आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या बँड पथकाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी बँड पथकचा गणवेश (युनिफॉर्म ) परिधान करून खुर्च्यांवर बसले आहेत आणि सर्वजण त्यांच्या हातातील वाद्याच्या मदतीने ‘श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में’ हे भजन वाजवत आहेत. एकदा तुम्हीसुद्धा बघा हे खास सादरीकरण.

हेही वाचा…VIDEO: अयोध्येतील जॅग्वार कारची तुफान चर्चा! रामभक्ताने महागड्या गाडीवर साकारलेली ‘रामनगरी’ पाहा

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओ अयोध्येतील आहे. कारण रस्त्यावर अयोध्येतील हनुमान गढी लिहिलेला एक मोठा बॅनर लावला आहे. तर या बॅनर समोर रस्त्याकडेला उत्तर प्रदेशातील पोलिसांचे बँड पथक उत्तम सादरीकरण करताना दिसले आहेत. एक सारखा गणवेश, डोक्यावर फेटा आणि हातात ट्रम्पेट वाद्य घेऊन हे खास भजन सादर करण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @ChapraZila या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में’ या भाजनावर अयोध्येत उत्तर प्रदेश पोलिस पथकाचा उत्कृष्ट बँड” ; असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. तसेच बँडवर सादर होणार भजन ऐकण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली आहे. तर काही जण त्यांच्या मोबाईलमध्ये या सादरीकरणाचा व्हिडीओ शूट करून घेताना दिसत आहेत.