Waiter Comforts Child So Mother Can Eat Peacefully : मार्केट, हॉटेल किंवा अगदी फिरायला जातात लहान मुलांना बरोबर घेऊन जाणे म्हणजे एक टास्कच असतो. घरी शांत राहणारी ही मुले बाहेर गेल्यावर एवढी मस्ती करतात की, पालकांना सांभाळणे कठीण होऊन जाते. ही लहान मुले बाहेर गेल्यावर खायला नाटक करतात स्वतः काही खात नाहीत आणि आई-बाबांना सुद्धा खाऊ देत नाहीत. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये हॉटेलमध्ये आलेल्या आईला व्यवस्थित जेवायला मिळावे म्हणून वेटरने जबरदस्त गोष्ट केलेली दिसते आहे.

इन्स्टाग्राम युजर रात्री @shif_nas ११ च्या सुमारास, जेवणासाठी हॉटेलमध्ये गेली होती. यादरम्यान तिची लहान लेक सुद्धा तिच्याबरोबर होती. तर युजरचे जेवण संपेपर्यंत हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने (वेटर) त्या आईची मदत केली. ग्राहकाच्या लेकीबरोबर वेटर खेळत राहिले, नंतर तिला इडली छोटीशी दिली आणि मग तिला थोडा वेळ फेरी मारून आणले. युजरची लेक सहसा कोणाबरोबरही फिरत नाही. पण, त्या वेटरबरोबर ती बराच वेळ खेळत राहिली; जे पाहून ग्राहक महिलेला खूप छान वाटले.

आजोबा सारखी मुलाची घेतली जबाबदारी (Viral Video)

यादरम्यान कुठेही त्याच्या कामावर परिणाम सुद्धा होत नव्हता. तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की, कडेवर ग्राहकाच्या लेकीला उचलून घेऊन ते हॉटेलच काम सुद्धा करत होते. आई असताना अशा छोट्या छोट्या हावभावांचा खूप खोलवर परिणाम होतो ; त्यामुळे युजरने वेटरच्या आयुष्याबद्दल विचारणा केली. त्यावेळी तिला समजले की, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराची (वेटर) पत्नी कोविडमध्ये देवा घरी गेली. त्यांना दोन मुली आहेत. एकीचे लग्न झालं आहे तर दुसरी कॉलेजमध्ये आहे. तर घर चालवण्यासाठी आणि मुलीचा सांभाळ करण्यासाठी वेटर सकाळी शिंपी म्हणून काम करून मग दुसरी शिफ्ट रात्री ११ वाजेपर्यंत या हॉटेलमध्ये करतात. चिमुकलीला खेळवणाऱ्या वेटरचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @shif_nas या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये वेटर काकांची संपूर्ण गोष्ट लिहिण्यात आली आहे. तसेच व्हिडीओ पाहून नेटकरी “एकटाच कमावणारा आणि मुलांची काळजी घेणारा बाप सगळ्यांपेक्षा जास्त कष्ट करतो”, “अशा लोकांमुळेच हे जग टिकून आहे”, “मला वाटतं त्यांनी तुला मुलगी मानलं आणि आजोबा म्हणून तुझ्या मुलाची जबाबदारी घेतली” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.