Viral Video: एखादे नवीन गाणे प्रदर्शित झाले की ते सोशल मीडियावरही तितकेच चर्चेत येते. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. मागील काही दिवसांपूर्वी ‘इल्युमिनाटी’ हे गाणं खूप चर्चेत होतं, ज्यावर अनेक डान्स तुम्ही पाहिले असतील. पण, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक चिमुकला टीव्हीवर हे गाणं पाहत असून पाहता पाहता डान्स करत आहे.
हल्लीची लहान मुलं पटकन नवनवीन गोष्टी शिकतात. अनेकदा अभ्यासापेक्षा त्यांचे सोशल मीडियाच्या ट्रेंडवर अचूक लक्ष असते. एखादे नवीन गाणे आले की ते त्यांना नेहमीच तोंडपाठ असते. अनेकदा शाळेत शिकविलेल्या कविता त्यांच्या लक्षात रहात नाहीत, पण रील्समध्ये मुले गाणी पटापट बोलत असताना दिसतात. दरम्यान, भारतातील विविध भाषांतील गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. मल्याळम भाषेतील ‘आवेशम’ चित्रपटातील ‘इल्युमिनाटी’ हे गाणेदेखील सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहेत. या गाण्यावर अनेक जण रील्सदेखील बनवत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान चिमुकला घरामध्ये टीव्ही बघत असून यावेळी टीव्हीवर तो ‘इल्युमिनाटी’ हे गाणं पाहताना दिसत आहे. यावेळी त्या गाण्यातील डान्स पाहता पाहता तो चिमुकला डान्स करायला सुरुवात करतो. त्याचा मजेशीर डान्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून अनेक जण त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत तीन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि ७० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने या व्हिडीओवर कमेंटमध्ये लिहिलंय, “भावा जरा हळू नाच”, दुसऱ्या युजरने लिहिलेय, “व्वा, तो किती आनंदी आहे.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “बाळा, तुझा डान्स खूप मस्त आहे”, तर आणखी एकाने लिहिलेय, “तो त्याची कला जोपासतोय मस्त बाळा.”