Viral Video Father In Laws Sweet Gesture : सध्या लग्न झाल्यानंतर वेगळं व्हायचं, असा बहुतेक सुनांचा हट्ट असतो. पण, आई-बाबांसारखी काळजी करणारे, जपणारे, समजून घेणारे सासू-सासरे मिळाले, तर सूनही घरात अगदी लेकीसारखी नांदू शकते. असेच काहीसे दृश्य दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये सासरा आणि सून यांचे वडील-मुलीच्या नात्यासारखे दृश्य बघायला मिळाले आहे.
सुनेने तिच्या हाताला मेंदी लावली आहे. मेंदी दाखवत, व्हिडीओ शूट करीत ती सासऱ्यांकडे येते आणि हाताला मेंदी लावल्यामुळे तिच्या सासऱ्यांनी स्वयंपाकाची जबाबदारी स्वत:वर घेतलेली असते. सासरेदेखील हसत-खेळत ती जबाबदारी स्वीकारतात आणि सुनेसाठी स्वयंपाक करणे तर “नशिबाची गोष्ट आहे” असे अगदी आपुलकीने म्हणतात.
हाच तर स्वर्ग आहे (Viral Video)
लग्न म्हटलं की, दोन माणसांचे नाही, तर दोन कुटुंबांचे मिलन असते. दोन्ही कुटुंबांत नवीन सदस्याची एन्ट्री होते. सूनेच्या रूपात मुलगी आणि जावयाचा रूपात मुलगा मिळतो. सासू-सुनेचं नातं तसं बदनामच आहे. पण, काळ बदलत चालला आहे आणि सासू-सासरे आपल्या सुनेबरोबर लेकीप्रमाणे गुण्यागोविंदाने राहू लागल्याचेही चित्र दिसू लागले आहे. याच गोष्टीचं प्रत्यंतर आपल्याला व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळते आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @laddu_or_gopal_ki_maiyya_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “वडिलांकडून आणि सासरच्यांकडून किती प्रेम मिळत आहे. हाच तर स्वर्ग आहे” , “तू कोणता उपवास केला होतास, जरा आम्हालापण सांग”, “अशी माणसं पण आहेत या जगात, जी स्वतःच्या सुनेला लेक समजतात”, “खूप नशिबाने मिळतात अशी माणसं”, “जी मुलगी सासऱ्यांसमोर मोकळेपणाने हसू शकते, ती आईच्या घरी जाण्याचे स्वप्न पाहत नाही” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.