Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. सोशल मीडियावरील ट्रेंड सतत विविध गोष्टींमुळे बदलत असतो. कधी थरकाप उडवणारे व्हिडीओ, तर कधी आपले मनोरंजन करणारे व्हिडीओ सातत्याने आपल्या डोळ्यांसमोर येतात. बऱ्याचदा यावर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यात नकळत घडलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

आई म्हटलं की, आपल्या नजरेसमोर तिचं प्रेम, माया, निस्वार्थ भाव येतो. आई आपल्या लेकरांसाठी जगातील सर्वात कठीण प्रसंगांना समोरे जाऊ शकते. वेळप्रसंगी ती स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या लेकराला वाचवते. अशी असंख्य उदाहरणं आपण आजवर पाहिली आहेत. पण, आता एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक आई आपल्या लेकराला संकटात टाकून तिथून पळ काढताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला रस्त्यावरून तिच्या मुलीला घेऊन जात असून तिने तिच्या मुलीला हातात उचलून घेतले होते. यावेळी अचानक एक कुत्रा तिथे येतो अन् महिलेच्या जवळ जातो, त्यामुळे महिला घाबरून मुलीला खाली सोडून तिथून सरळ पळ काढते. यावेळी तो श्वान मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, काही लोक तिला वाचवतात. महिलेने स्वतःच्या लेकीला असं रस्त्यावर टाकून पळ काढल्यामुळे नेटकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @bro_kalyug या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि अनेक अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “ही आई नाही; मूर्ख बाई आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “काय मूर्ख आहे ही.” तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “ही वेडी आहे का?”