Viral Video Woman Defended Herself For Using Leash For Toddler : लहान मुल घरात असलं की घर भरल्यासारखं वाटतं, मुलांचा सतत दंगा सुरू असतो. दंगा करणं एकवेळ ठिक आहे, पण, त्याच्या खोड्या, मस्तीही सुरूच असतात. त्यामुळे लहान मुलांना सांभाळणे म्हणजे अतिशय पेशन्सचे काम असते. मुलं आपल्या संयमाची अनेकदा परीक्षाच घेत असतात. लहान मुल घरात असलं की घर भरल्यासारखं वाटतं, मुलांचा सतत दंगा सुरू असतो. दंगा करणं एकवेळ ठिक आहे, पण, त्याच्या खोड्या, मस्तीही सुरूच असते. त्यामुळे त्यांची सुरक्षा करणे ही आपलीच जबाबदारी असते. तर हा हीच जबाबदारी पार पडताना एक महिला ट्रोल झाली आहे.

व्हायरल व्हिडीओ न्यू यॉर्कचा आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या शुभांगी जगोता, न्यू यॉर्क शहरात त्यांच्या कुटुंबाबरोबर फिरायला गेल्या आहेत. यादरम्यान त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांचा नवरा आणि मुलगा दिसतो आहे. त्यांच्या मुलाच्या आणि लेकाच्या हाताला स्प्रिंग सारखा दिसणारा पट्टा बांधला आहे; जेणेकरून तिचा मुलगा कुठे लांब धावत जाणार नाही. पण, हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

ही लाज नाही तर सुरक्षा… (Viral Video)

हा व्हिडीओ पाहून एका युजरने कमेंट केली की, “तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्या मुलाला नियमांचे पालन करायला शिकवा. त्याला पट्ट्या बांधू नका. जर त्याला पळायचे असेल तर तुम्ही त्याच्या मागे धावा,” तर ही कमेंट पाहून शुभांगी जगोताने व्हिडीओ शेअर कर सांगितले की, “माझा मुलगा ३.५ वर्षांचा आहे आणि आम्ही त्याला पट्ट्या बांधला आहे आहे हे सांगायला आम्हाला लाज वाटत नाही. न्यू यॉर्कसारख्या शहरात, आमच्या प्रवासासाठी हा सगळ्यात बेस्ट निर्णय होता. आमच्या छोट्या धावपटूला नेहमीच त्याचे स्वातंत्र्य हवे असते आणि यामुळे त्याला ते मिळाले. दर ५ मिनिटांनी तो गर्दीत कुठे हरवला आहे असा धक्का सुद्धा आम्हाला बसत नाही,” ; अशी कॅप्शन तिने पोस्टला दिली आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @katchmyparty या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा कॅप्शन पाहून महिलेच्या समर्थनात उतरले आहेत. “गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांना हाताळणे सोपे नाही. पट्टा त्यांना सुरक्षित ठेवतो त्यामुळे पट्टा बांधणे बेस्ट आहे”, “विमानतळावर एका अतिउत्साही मुलाबरोबर एकटे प्रवास करताना मी पट्ट्याचा वापर केला आहे. ही लाज नाही तर सुरक्षा आहे”, “हे लहान मुल तुम्हाला वाटते त्यापेक्षा वेगाने धावतात. सुरक्षितता प्रथम येते,” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.