Mumbai Local Video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची लगबग आणि धक्काबुक्की करत ‘अंदर बहुत जगा है’ असं म्हणत मुंबई लोकलमध्ये दर दिवशी असंख्य माणसांची गर्दी पाहायला मिळते. पण अनेकदा कामावरून परतताना अनेकांना खूप उशीर होतो.

विशेष म्हणजे महिला उशीरा रात्री प्रवास करणं टाळतात. तसंच अनेकदा रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यात पुरूषही प्रवास करतात. अनेकदा तर डबा रिकामीच असतो. आणि इतक्या रात्री एकटीने प्रवास करण्याची भीती कोणालाही सहज वाटू शकते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ (Woman Local Train Viral Video)

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच सगळीकडे याची चर्चा सुरू आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक महिला रात्रीच्या वेळी लोकलमधून प्रवास करत आहे. ती ज्या डब्यात आहे तो डब्बा संपूर्ण रिकामा दिसतो आहे. रात्रीची वेळ असल्याने महिलेला भीती वाटली आणि यादरम्यान तिने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला. व्हिडीओमध्ये महिला, “पूर्ण ट्रेन खाली आहे कल्याणला पोहोचेपर्यंत एकटी घाबरली होती पण यांना बघितलं आणि जीवात जीव आला” असं म्हणाली. यानंतर महिलेने सेल्फी कॅमेरा सुरू करून महिला पोलिसेला दाखवत धन्यवाद असंही म्हणाली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @chitrapagare16 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ९१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तसंच “कल्याणला पोहोचेपर्यंत पूर्ण ट्रेन रिकामी झाली, खूप भीती वाटली. पण मागे वळून पाहिले तर पोलिसांना पाहून जीवात जीव आला” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मुंबई पोलिस… जय महाराष्ट्र”, तर दुसऱ्याने “बघून अंगावर काटा आला पण पोलीस मॅडमना बघून बरं वाटलं” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “मुंबई पोलिसांचा अभिमान आहे.” तर एकाने “दिवस रात्र तुम्ही जनतेच्या सेवेसाठी असता तुम्हीच विठ्ठल आणि तुम्हीच आमच्या रखुमाई” अशी कमेंट केली.