अजगर हा जगातील असा प्राणी आहे, जो स्वतःपेक्षा मोठ्या प्राण्यांनाही गिळू शकतो. जर कुणी अजगराच्या तावडीत सापडलं तर त्याची सूटका होणे सगळ्यात अवघड असतं. अजगराचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.एखाद्या प्राण्याची शिकार करतानाही तुम्ही अजगराला पाहिलं असेल. अजगराचं नाव काढलं तरी अंगाला घाम फुटतो आणि त्यात जर विचार करा सकाळी तुम्ही घराबाहेर पडलात आणि तुमच्या समोर मोठा अजगर आला तर? या घटनेची साधी कल्पनाही करवत नाही. पण सध्या एक असाच व्हिडीओ चर्चेत आला आहे जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून तुमचीही झोप उडेल. जाळीदार अजगर - या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक भलामोठा अजगर एका घराबाहेर दिसत आहे. लांबलचक असं हे अजगर अतिशय आकर्षक तंत्र वापरून पुढे पुढे सरकताना दिसत आहे. हा अजगर काळ्या रंगाचा असून या जाळीदार प्रजातीचा हा अजगर आहे. जाळीदार अजगर ही दक्षिण आणि आग्नेय आशियातील अजगराची प्रजाती आहे . हा जगातील सर्वात लांब साप आहे आणि तीन सर्वात वजनदार सापांपैकी एक आहे. ज्याची 1.5 ते 6.5 मीटर (4.9 ते 21.3 फूट) आणि वजन 75 किलो पर्यंत वाढू शकतं. अशा प्रकारची लांबी आणि वजन असणाऱ्या सापांना झाडांवर किंवा चढ्या पृष्ठभागांवर चढणे कठीण असते. पाहा व्हिडीओ - हेही वाचा - Video: ‘त्या’ ९ जणांसाठी सोन्याची खाण ठरली मृत्यूचं दार! पुढे जे घडलं ते पाहून व्हाल थक्क Science girl नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत या व्हिडीओला ५ मिलियनहून अधिक व्ह्यूज गेले आहेत.