Viral Video: सोशल मीडियावर दर दिवशी वेगवेगळे हटके व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे व्हिडीओ, तर कधी गाणी म्हणतानाचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी एखादी हटके ट्रिक व्हायरल होते, तर कधी एखादं गाणं चर्चेत येतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक तरुण लल्लाटी भंडार या गाण्यावर डान्स करताना दिसतोय.

जोगवा हा मराठी चित्रपट २००९ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटातली सगळी गाणी लोकप्रिय ठरली होती. या चित्रपटातलं लल्लाटी भंडार हे गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. हे गाणं कुठेही ऐकलं की, आपले पाय आपोआप थिरकायला लागतात. सध्या या व्हिडीओतील तरुणही या गाण्यावर नाचताना दिसतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण लल्लाटी भंडार गाण्यावर सुंदर डान्स करत आहे. यावेळी त्याच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरीही त्याचे कौतुक करीत आहेत. त्याचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shivanshu_the.fusionist_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत सहा दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरनं लिहिलंय, “व्वा काय नाचला”. आणखी एकानं लिहिलंय, “खूप सुंदर डान्स”. आणखी एकानं लिहिलंय, “एकदम जबरदस्त भावा”. एका व्यक्तीनं लिहिलंय, “लय भारी डान्स”.