Viral Video Young Boy Jumps Off Moving Bike : अनेकांचा अर्धाअधिक वेळ आता इन्स्टाग्रामचे रील्स पाहण्यात जातो. सकाळी ऑफिस, कॉलेजला पोहोचेपर्यंत ते अगदी रात्री झोप लागेपर्यंत आपण रील्स स्क्रोल करत असतो. इन्स्टाग्राम रील्स बघण्याचा मोह जसा वाढला आहे त्याचप्रकारे रिल्स बनवण्याचा छंदही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. काही जण अगदी काही सेकेंदाच्या रील व्हिडीओसाठी स्वतःचा आणि दुसऱ्यांच्या जीव धोक्यात घालू लागले आहेत. तर आज सोशल मीडियावर सुद्धा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओत दोन मित्र दुचाकीवरून प्रवास करत असतात. तर त्यांच्या अगदी शेजारी त्यांचे मित्र व्हिडीओ शूट करत असतो. बघता बघता दुचाकी चालवणारा मित्र चालत्या दुचाकीवरून थेट खाली उतरतो. या प्रसंगी मागे बसलेल्या दुसरा मित्र बघतच राहतो आणि एका सेकेंदासाठी काय करावे हेच सुचत नाही. तो पटकन घाबरून दुचाकीचे हँडल पकडायला जातो. पण, दुचाकी थेट खाली जमिनीवर पडते आणि तोही दुचाकीबरोबर खाली पडतो आणि जोरात आपटतो.

“ही नक्कीच त्याच्या मित्राची स्कुटी असणार” (Viral Video)

दोन सेकेंदाच्या रीलसाठी धोकादायक ठिकाणी चढणे, आगळेवेगळे स्टंट करणे, त्याचबरोबर स्वतः स्टंट करणे आणि इतरांनाही स्टंट करायला भाग पाडणे आदी अनेक गोष्टी ही तरुण मंडळी करत असतात. त्यांना दुखापत होईल किंवा गाडीचे नुकसान होईल याबद्दल जराही कल्पना नसते. आज व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, गाडीवर मागे बसलेल्या मित्राला दुखापत होणार हे माहिती असूनही दुचाकी चालवणारा मित्र थेट चालत्या गाडीवरून उतरतो. पुढे काय घडते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीच बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @swapangain01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. “भावाला त्याचे मित्र बदलण्याचा मजबूत पुरावा मिळाला आहे. हे अजिबात मजेदार नव्हते”, “त्याला गंभीर दुखापत झाली असेल”, “ही नक्कीच त्याच्या मित्राची स्कुटी असणार, स्वतःच्या स्कुटीबरोबर तो असं कधीच करणार नाही” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.