Viral Video: लावणी नृत्य ही महाराष्ट्राची लोककला आहे. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच; पण त्या लावणीमध्ये एक ठसकेबाजपणा, नजाकतही असावी लागते. हल्ली सोशल मीडियामुळे एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, त्यातील काही मोजकेच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत येतात. आताही असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियामुळे विविध विषयांवर आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात कधी सार्वजनिक कार्यक्रमातले, तर कधी लग्नाचे व्हिडीओ, तर कधी नृत्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु, त्यातील काही मोजकेच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आलाय, ज्यात एक तरुणी खूप सुंदर लावणी करताना दिसतेय.

लावणी हा नृत्यप्रकार आता फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून, अनेक अमराठी कलाकार आणि परदेशातील कलाकारही आवडीने सादर करतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील तरुणीदेखील अतिशय उत्तम पद्धतीने लावणी सादर करताना दिसतेय. “नाचू किती नाचू किती कंबर लचकली”, या जुन्या सुप्रसिद्ध लावणीवर तिने ठेका धरला. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि नृत्यातील नजाकत पाहायला मिळाली. तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @bhumikatiwari.official या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “आई गं, किती गोड नाचली.” दुसऱ्याने लिहिलेय, “काटा कीर्र नाचली राव.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “गावरान तडका राव.”