Viral Video: समाजमाध्यमांवर सतत विविध विषयांवरील व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात; ज्यातील काही व्हिडीओ ठरवून शूट केले जातात. त्यामध्ये लोकांचे मनोरंजन करणाऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर, काही व्हिडीओतील घटना नकळत शूट केलेल्या असतात; ज्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊन, लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. आता एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून अनेक जण अवाक् झाल्याचे दिसत आहे.

तुम्ही आजपर्यंत अनेक चित्रपट, मालिकांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या अंगात भूत शिरल्याचे पाहिले असेल. भूत अंगात येणे या गोष्टीकडे अनेक जण अंधश्रद्धा म्हणून पाहतात; तर काही जण ही गोष्ट खरी समजतात. सध्या समोर आलेल्या एका व्हिडीओ असाच एक प्रकार पाहायला मिळत आहे. या व्हिडीओतील एका तरुणीच्या अंगात चक्क भूत शिरल्याचे म्हटले जात आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लायब्ररीमध्ये विद्यार्थी अभ्यास करत असून यावेळी तिथे बसलेली एक तरुणी अचानक विचित्रपणे वागू लागते. ती स्वतःचे केस मोकळे सोडून डोकं जोरजोरात फिरवते. त्या तरुणीच्या त्या हालचाली पाहून काही विद्यार्थी लांब जाऊन उभे राहतात आणि तिचा व्हिडीओ शूट करायला सुरुवात करतात. या व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तींनी ‘सेंट्रल लायब्ररीत आलं भूत’, असं लिहिलं आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Itss_lawgical (@itss_lawgical)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @itss_lawgical या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर सहा लाखाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तर एका युजरने लिहिलंय, “बापरे काय झालं नक्की हिला”. तर दुसऱ्याने लिहिलंय, “खूपच खतरनाक आहे”. तर आणखी एकाने लिहिलंय, “भूत खरंच असतं का?”