Viral Video: या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य सारखं नसतं. काही जण संपूर्ण आयुष्य श्रीमंतीत जगतात, तर काहींना दोन वेळचे अन्न कमावण्यासाठीही खूप मेहनत घ्यावी लागते. आजपर्यंत तुम्ही सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झालेले पाहिले असतील, ज्यातील काही व्हिडीओतील दृश्य आपल्या मनाला स्पर्शून जातात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो व्ह्युज आणि लाइक्सही मिळवतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

मुलगा वयात आला की, त्याच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारीही येते. कुटुंबाची जबाबदारी माणसाला अनेकदा स्वतःला विसरून कठीण प्रसंगांना सामोरे जायला भाग पाडते. श्रीमंत घरातील तरुणांसाठी ही फार मोठी गोष्ट नसली तरीही अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील मुलांना अनेकदा अनेक गोष्टी करायला भाग पाडते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काही पाहायला मिळत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका समुद्रातील असून यावेळी मासेमारी करणारे तीन तरुण त्यांच्या नावेत उभे राहिलेले दिसत आहेत. यावेळी त्यातील दोघे हातात दोरी पकडतात आणि पाण्यात एकाच वेळी उडी मारतात, त्या दोघांनीही पाण्यात उडी मारल्यानंतर त्यांच्याबरोबर मासे पकडण्यासाठी वापरली जाणारी जाळीदेखील पाण्यात जाते. मासेमारी करण्यासाठी तरुण वापरत असलेली ही पद्धत पाहून नेटकरीही भारावले आहेत. घरची जबाबदारी माणसाला खूप काही करायला भाग पाडते, ही गोष्ट यातून लक्षात येते.

हेही वाचा: ‘शेवटी त्यालाही कळली आईची माया…’ मुलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या आईची ट्रेन गार्डने केली मदत; हृदयस्पर्शी VIDEO पाहून व्हाल भावूक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @official_vishwa_96k या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “खूप वाईट”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते.” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “प्रत्येक दिवस सारखा नसतो.”