Wedding Bride Friends Add 7 Unique promises Viral Video : लग्न हा जोडप्यासाठी जितका खास दिवस असतो तितकाच तो त्यांच्या जवळच्या व्यक्तींसाठी सुद्धा असतो. घरातील बहीण असो किंवा भाऊ, काका असो किंवा मावशी किंवा जोडप्याचे अगदी जवळचे मित्र-मैत्रिणी त्यांच्यासाठीही हा दिवस अगदी आनंदायी असतो. शूज लपवणे असो किंवा मंडपात वरात घेऊन येतो असो सोशल मीडियावर असे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात; यामध्ये लग्नाच्या एक विधी अगदी मजेशीर पद्धतीने साजरी करण्यात आली आहे; त्यामुळे हा विषय अगदी चर्चेचा विषय ठरलेला आहे.

रुचिका असटकर @ruchika_asatkar या इन्स्टाग्राम युजरने शेअर केलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये, लग्न समारंभ नेहमीप्रमाणे पार पडला जात आहे; ज्यामध्ये पारंपारिक विधी पार पाडत असतात, ज्यात सात वचन समाविष्ट आहेत. विधी पूर्ण करून झाल्यानंतर वधूच्या मैत्रिणी पुढे येतात आणि “आता दुसऱ्या सात वचनांची वेळ आली आहे. आम्ही पुजाऱ्याचे विधी ऐकले आहेत. आता तुम्ही आमचे विधी ऐका” ; असे म्हणतात. हातात एक मोठे बनावट कार्ड घेऊन मैत्रिणी सात वचन वाचायला सुरुवात करतात.

आता तुम्ही आमचे विधी ऐका (Viral Video)

प्रत्येक वचन वधूच्या, प्रतिक्षेच्या मर्जीने तयार केले आहे. यामध्ये “मी प्रतिक्षाला नेहमीच आनंदी ठेवेन, कोणत्याही अटीशिवाय, मी वर्षातून तीन वेळा प्रतिक्षाला फिरायला घेऊन जाईन, मी तिच्यासोबत सुशी खायला जाईन, मी दररोज प्रतिक्षासाठी स्वयंपाक करेन, मी प्रतिक्षाच्या कन्टेन्ट क्रिएशनला पाठिंबा देईन, मी प्रतिक्षाला कधीही नाही म्हणणार नाही – जेवणासाठी असो किंवा लांबच्या प्रवासासाठी… प्रतिक्षा नेहमीच बरोबर असते” असे सात वचन त्या बनावट कार्डवर लिहिण्यात आले आहेत.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ruchika_asatkar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा मजेशीर क्षण पूर्ण करण्यासाठी नवऱ्याने मोठ्या आकाराच्या त्या बनावट कार्डवर स्वाक्षरी केली. प्रत्येक वचन वेगवेगळ्या मैत्रिणीने वाचले; ज्यावरून असे सूचित होते की, संपूर्ण मैत्रिणींच्या ग्रुपने या गोष्टीचा प्रचंड सराव केला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत आणि “आमच्या इथे असे केलं असतं तर दोन मिनिटात बाजूला करतील” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत…