Viral wedding card: सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे. त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कधी वधू-वरांचे व्हिडीओ व्हायरल होतात, तर कधी लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या कृतीही व्हायरल होऊ लागतात. नुकतीच लग्नाची पत्रिका व्हायरल झाली.आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की नक्की त्यात असं काय असेल? लग्नात काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. यात लग्नपत्रिकाही अपवाद नाही. कधी लग्नपत्रिकाच विचित्र असते तर कधी त्यातील मजकूर. अशा कितीतरी लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यात आता आणखी एका लग्नपत्रिकेची भर पडली आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत बऱ्याच लग्नपत्रिका व्हायरल झाल्या आहेत. आतासुद्धा अशाच एका कार्डनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या लग्नपत्रिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
प्रत्येकजण लग्न करतो, परंतु प्रत्येकाचे लग्न प्रसिद्धीच्या झोतात येत नाही. केवळ अशाच लोकांची लग्नं चर्चेत येतात, जे एकतर श्रीमंत किंवा सेलिब्रिटी आहेत. अशातच, लोक त्यांचे लग्न प्रसिद्ध करण्यासाठी काहीही करू लागले आहेत. काही लोक लग्नात पैसे खर्च करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करतात, तर काहींना खास ठिकाणी लग्न करून जगाच्या नजरेत यायचे असते. तसे, आजकाल चर्चेत येण्याचा आणखी एक मार्ग खूप प्रचलित आहे आणि तो म्हणजे लग्नपत्रिका. लोक त्यांच्या लग्नाची पत्रिका अनोख्या पद्धतीने छापत आहेत. आजकाल अशीच एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जी पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
आता तुम्ही म्हणाल या लग्नपत्रिकेत असं लिहलंय तरी काय? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, लग्नाच्या पत्रिकेत नातेवाईकांची काही मोजक्या आपल्या जवळच्या पाहुण्यांची नावं टाकली जातात. मात्र सध्या समोर आलेली पत्रिका पाहून म्हणाल संपूर्ण गावाचीच नाव छापली आहेत की काय. या पत्रिकेत तुम्ही पाहू शकता, चक्क मावशीचा परिवार मग त्याखाली मावशीच्या परिवारातल्या लोकांची नावं. खाली मामाचा परिवार, जावयांचा परिवार, दादा वहिनी परिवार मग त्याखाली त्या त्या परिवारातल्या लोकांची नावं…अशा जवळ जवळ तिन पानांच्या पत्रिकेमध्ये ३०० ते ३५० नावं छापन्यात आली आहेत. ही लग्नपत्रिका पाहून तुमचेही डोळे चक्रावून जातील एवढं नक्की.
पाहा लग्नपत्रिका
सोशल मीडियावर ही लग्नपत्रिका shwet_ttta नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.