क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली आणि सलग १० सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या टीम इंडियाच्या वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या. पण, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्स राखून पराभव केला आणि यासह करोडो भारतीय चाहत्यांचे आणि टीम इंडियाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले आणि ऑस्ट्रेलियन संघ सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. या सामन्यानंतर भारतीय फलंदाज विराट कोहलीला विश्वचषक २०२३ मधील ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. परंतु, त्याच्यासाठी सर्वात मोठा आनंद हा विश्वचषक ट्रॉफी उचलण्याचा होता, मात्र ते स्वप्न काही पूर्ण झाले नाही. यानंतर कोहली कितीही दु:खी झाला असला तरी त्याने आपल्या सहकाऱ्यांना आनंदी ठेवण्याचा नेहमीप्रमाणेच प्रयत्न केला, अंतिम सामन्यातही तेच दिसून आले. त्याने विश्वचषक २०२३ च्या विजेत्या संघातील खेळाडू आणि आरसीबी संघातील त्याचा सहकारी ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारली आणि विजयाबद्दल अभिनंदन केले. यानंतर त्याने मॅक्सवेलला एक खास वस्तू भेट म्हणून दिली, ही भेटवस्तू म्हणजे त्याची जर्सी.

विश्वचषक २०२३ फायनलनंतर पार पडलेल्या सोहळ्यात विराट कोहली मैदानात येऊन ग्लेन मॅक्सवेलला भेटला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. एक खेळाडू म्हणून विराट कोहली यावेळी कोणत्या दु:खातून जात असेल हे मॅक्सवेल समजू शकत होता, म्हणून त्याने विराटला मिठी मारत सांत्वन केले. यानंतर विराट कोहलीने त्याच्या मॅच जर्सीवर स्वाक्षरी केली आणि ग्लेन मॅक्सवेलला भेट म्हणून दिली. टीम इंडियासाठी भावूक क्षण असतानाही विराटने मोठ्या मनाने विजयी संघाचे कौतुक केले.

Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव

ग्लेन मॅक्सवेल आणि विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजेच आरसीबीमध्ये एकत्र खेळले. मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता.

Australia Won World Cup 2023 Final: वर्ल्ड कपची ट्रॉफी पायाखाली! मिशेल मार्शच्या ‘या’ कृतीवरून वादंगाची शक्यता

२०२३ च्या वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीने ११ डावांमध्ये ९५.६२ च्या सरासरीने आणि ९०.३२ च्या स्ट्राईक रेटने एकून ७६५ धावा केल्या. यामध्ये तीन शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटने वर्ल्डकपमध्ये ६८ चौकार आणि ९ षटकारही मारले. मात्र, अंतिम सामन्यात संघाला विजेतेपद मिळवता येऊ शकले नाही.