मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहेत. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव, तर विराट कोहलीला रन मशिन म्हणून संबोधित केलं जातं. काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मास्टर ब्लास्टर यांच्या निवृत्तीमुळे क्रिकेटच्या एका युगाचा अंत झाला. सचिन तेंडुलकर यांच्या निवृत्तीवेळी विराट कोहली संघातील तरुण खेळाडू होता. सचिन तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत होता. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांच्या निवृत्तीवेळी विराट कोहली भावूक झाला होता. त्यावेळी घडलेला प्रसंग सचिन आणि विराट कोहलीने एका मुलाखती दरम्यान सांगितला.

विराट कोहलीला त्याच्या दिवंगत वडिलांनी दिलेल्या पवित्र धाग्याची ही कथा होती. टीम इंडियासोबत सचिनच्या शेवटच्या क्षणांमध्ये विराट त्याच्याकडे गेला आणि त्याने नाराज मास्टर ब्लास्टरला धागा सादर केला. मात्र सचिनने हा धागा न घेता विराटला परत केला. सचिन तेंडुलकर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “मी एका कोपऱ्यात एकटाच बसलो होतो, मी खूप भावूक झालो होतो आणि माझ्या डोळ्यात अश्रू होते. त्यावेळी विराट माझ्याकडे आला आणि मला त्याच्या वडिलांनी दिलेला पवित्र धागा दिला. पण मी म्हणालो तो अनमोल आहे, शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासोबत ठेव. असे म्हणत मी धागा परत केला.”

विराट कोहलीनेही मुलाखतीत दुजोरा देत सांगितले होते की, “भारतात आपण अनेकदा आपल्या हातावर पवित्र धागा बांधतो. माझ्या वडिलांनी मला दिला होता. हा धागा माझ्या बॅगेत ठेवत असे. मला वाटले की ही माझ्याकडे असलेली सर्वात खास गोष्ट आहे. पवित्र धागा मला माझ्या वडिलांनी दिला होता. मी सचिन तेंडुलकर यांना सांगितलं एक छोटीशी भेट आहे जी मला तुम्हाला द्यायची आहे. ही भेटवस्तू देऊन आमच्या सर्वांसाठी तुम्ही किती खास आहात, हे सांगायचे आहे.”

IND vs WI : “दात दाखवू नकोस…”, रोहितनं पुन्हा एकदा चहलला केलं ट्रोल; पाहा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सचिन तेंडुलकर यांनी १५ नोव्हेंबर १९८९ ते १४ नोव्हेंबर २०१३ पर्यंत २४ वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा केली. सचिन तेंडुलकर अजूनही कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. त्यांच्या नावावर ३४ हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा आहेत. ज्यामध्ये एकूण १०० शतके आणि १६४ अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे विराट कोहलीने २००८ मध्ये भारतासाठी वनडे पदार्पण केले आणि २०११ मध्ये त्याला कसोटी कॅप मिळाली. आतापर्यंत त्याच्या नावावर जवळपास २४ हजार आंतरराष्ट्रीय धावांची नोंद झाली आहे. सचिनसोबत जवळपास निम्मे सामने खेळला आहे. विराटच्या नावावर आतापर्यंत ७० शतके आणि ९२ अर्धशतकांचा समावेश आहे. २०१९ पासून विराट कोहलीच्या ७१ व्या शतकाची वाट पाहत आहे.