सोशल मीडियावर माणूस आणि मुक्या प्राण्यांमधील जिव्हाळा दाखवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही हृदयस्पर्शी व्हिडीओ असे असतात जे पाहून आपणही भावूक होतो. या व्हिडीओंमध्ये कुत्रा आणि माणसांशी संबधित व्हिडीओंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. नुकतेच चेन्नईत पूराच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्यांला एका व्यक्तीने वाचवलं होतं ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. जो पाहून नेटकरी, माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं म्हणत आहेत.

खरं तर, मुक्या प्राण्यांवर तुम्ही एकदा का जीव लावला तर ते तुमची साथ कधीच सोडत नाहीत. याचेच एक उदाहरण समोर आले आहे. सध्या लखनऊ मधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक निराधार मजूर आणि आणि त्याचा विश्वासू कुत्रा पाहून त्यांचा व्हिडीओ शूट करण्याचा मोह चित्रपट निर्माते आणि लेखक विनोद कापरी यांनाही आवरता आला नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मुके प्राणी तुम्हाला तुमच्या कठीण परिस्थितीमध्येही कशी साथ देतात हे पाहायला मिळत आहे.

हेही पाहा- “माणुसकी अजूनही जिवंत आहे!” चेन्नईत पूराच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्यांचा व्यक्तीने वाचवला जीव; लोकांनी केले कौतूक

या व्हिडीओमधील कुत्रा आणि माणूस यांची ओळख खूप दिवसापासूनची असल्याचं दिसत आहे. शिवाय हा मजूर जिकडे जातो तिकडे तो कुत्रा देखील जाताना दिसत आहे. व्हिडीओतील मजूर व्यक्ती रस्त्यावरील कचरा गोळा करत असताना कुत्रा त्याच्या मागून जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ एक्स (ट्विटर)वर शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

“कधीही न विसरता येणारे क्षण. लखनऊमध्ये मध्यरात्री एका लग्न समारंभाहून परत येत असताना शाहमीना रोडवर चहासाठी थांबलो. यावेळी एक माणूस कचरा गोळा करत होता आणि एक कुत्रा सतत त्याच्यामागून फिरत होता. काही वेळ मी हे सर्व पाहत राहिलो. त्यानंतर हा सर्व प्रकार शूट करण्याचा निर्णय घेतला. शूट केलेले क्षण आपल्या सर्वांसाठी अविस्मरणीय असे आहेत.” त्यांनी पुढे व्हिडीओतील व्यक्तीचं नावं शकील असून कुत्र्याचं नाव कल्लू असल्याचं सांगितलं आहे, तसंच त्यांनी सरकारने यांच्यासाठी काही मदत करावी अशी मागणी देखील केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओमध्ये शकील त्याची संपूर्ण माहिती देताना दिसत आहे, शिवाय कल्लू त्याबरोबर लहान असल्यापासून आहे असंही तो सांगताना दिसत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ३ लाख ५० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. शिवाय व्हिडीओतील व्यक्तीचं अनेकजण कौतुक करतानाही दिसत आहेत.