Leopard Viral Video : निसर्ग हा कधी कधी अत्यंत कठोर असतो, विशेषतः जंगलात जिथे प्राणी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सतत झुंज देतात. अशाच एका प्रसंगाचे दर्शन राजस्थानमध्ये झाले, जिथे एका बिबट्याने एका गायीच्या वासरावर हल्ला केला आणि त्याला आपलं शिकार बनवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात वासराच्या आईने मोठे धाडस दाखवत बिबट्याला घाबरवून तिथून पळवून लावले.
जेवढं प्रेम आई करते तेवढं जगात कोणीही करू शकत नाही मग तो माणूस असो, पशू असो किंवा पक्षी. आईचं प्रेम,जे संकटात ढाल बनतं, शौर्य जे कोणत्याही संकटाला सामोरे जाते, धाडस जे मृत्यूच्या छायेतून लेकरांना वाचवते. आईच्या प्रेमाची झलक एका व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळाली जेव्हा एका बिबट्याने वासरावर झडप घातली. वासराला वाचवण्यासाठी गाय थेट मृत्यूशी भिडली आहे.
व्हिडीओमध्ये पाहून शकता, जंगलातील पायवाटेने जाणाऱ्या वासरावर झुडुपात लपलेला बिबट्या अचानक हल्ला करतो. वासरच्या मानेला जबड्यात पकडून तो ओढून झुडपात जाणार तेवढ्यात वारसाची आई तिथे आहे. गाय बिबट्याच्या दिशेने पळत जाते जे पाहून बिबट्या तेथून धूम ठोकून पळून जातो.
हा थरारक व्हिडिओ राजस्थानच्या बाली, पाळी येथे सफारीवर गेलेल्या काही लोकांनी टिपलेला असून, सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला सुमारे १.२५ लाखाहून अधिक Views मिळाले असून, प्रेक्षक त्या गायच्या शौर्यावर भारावून गेले आहेत.
ब्लॅक पँथरचा व्हिडिओ
मागील महिन्यात, भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी प्रदीप कसवान यांनी तामिळनाडू मधील नीलगिरी परिसरात दोन सामान्य रंगाच्या चितांबरोबर एका ब्लॅक पँथरचा व्हिडिओ शेअर केला.
व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिलं: “नीलगिरीच्या रस्त्यांवर रात्रीची फेरफटका करणारा बघीरा (ब्लॅक पँथर) आणि त्याचे मित्र. किती दुर्मिळ दृश्य!”
यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की, ब्लॅक पँथर वेगळ्या प्रजातीचे नाहीत, तर सामान्य चित्यांचा (Panthera pardus) मेलनिस्टिक (जास्त काळा रंग असलेला) प्रकार आहेत.