गोट्या किंवा मार्बल बॉल्सनी तुम्ही अनेकदा लहानपणी खेळलाच असाल. एका रिंगण तयार करून एका मार्बल बॉलने दुसरा मार्बल बॉल्सवर अचूक नेम लावला जातो. पण, लहानपणी तुम्ही ज्या गोट्या किंवा मार्बल बॉल्सनी खेळला आहात किंवा आता तुमची मुलं ज्या मार्बल बॉल्सनी खेळत आहेत ; ते मार्बल बॉल्स कारखान्यात कसे तयार केले जातात हे पाहायला तुम्हाला आवडेल का ?

गोट्या (मार्बल बॉल्स ) बनवण्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; जो कारखान्यात जाऊन शूट केला आहे. कारखान्यातील कामगार सगळ्यात पहिला तुटलेल्या काचेच्या बाटल्या आणि काचेचे तुकडे गोळा करून भट्टीत टाकत आहेत. यानंतर हे तुकडे वितळवले जात आहेत. त्यानंतर ते मशीनमध्ये जातात आणि त्यांना गोल आकार देण्यात येतो. कारखान्यात कसे तयार होतात रंगीबेरंगी गोट्या एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…ग्राहकाची स्विगीकडे अनोखी डिमांड! पोस्ट पाहून डिलिव्हरी बॉय थेट पोहोचला तरुणाच्या घरी; पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा :

मशीनद्वारे आकार देण्यात आलेले या रंगीबेरंगी गोट्यांना नंतर कापून घेतलं जात आहे. त्यानंतर फळीच्या मदतीने एका बास्केटमध्ये भरले जात आहेत आणि विक्रीसाठी तयार करून ठेवले आहेत. अश्याप्रकारे लहानपणीच्या आठवणीतील या रंगीबेरंगी गोट्या कारखान्यात तयार केले जातात. तसेच आजकाल या रंगीबेरंगी गोट्या अनेक प्रकारच्या कलाकृतींमध्येही वापरल्या जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sweetnessishq’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘मार्बल बॉल्स तयार करण्याची प्रक्रिया’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी विविध शब्दात त्यांच्या भावना कमेंटमध्ये सांगताना दिसले आहेत. तर काही जणांच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत ; असे ते कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत.