Viral Video : अरेच्चा! इतकी वर्षं आपण चुकीच्या पद्धतीने सुईत धागा ओवतोय?

नाकासमोर सुई धरून तिच्यात पहिल्याच प्रयत्नात धागा ओवायचा म्हणजे कधी कधी एखादीचा जीव रडकुंडीला येतो. पण हा व्हिडिओ पाहिल्यावर मात्र तुमचे कष्ट वाचतील.

नाकासमोर सुई न धरता एका फटक्यात सुईत धागा कसा ओवायचा याचं प्रात्यक्षिक यात दाखवलं आहे.
‘तुला स्वयंपाक येतो का? आणि विणकाम, भरतकाम?’ समोरून मुलीनं मान डोलावली की पुढे.. ‘अच्छा.. मग बाळ सुईत धागा ओवून दाखव बरं!’ असा हुकूम ओघानं आलाचं. पहिल्याच फटक्यात धागा सुईत गेला तर ठिक नाहीतर पुढे काय घडतं हे वेगळं सांगायला नको. मुली पाहण्याच्या कार्यक्रमात असे अनुभव आधीच्या पीढीनं घेतले असतीलच. सुईत पहिल्याच प्रयत्नात धागा घालण्यासाठी अनेकांचा खटाटोप असायचा. पहिल्यात प्रयत्नात धागा गेला की परीक्षा जिंकल्याचा आनंद चेहऱ्यावर यायचा. पण पहिल्या प्रयत्नात धागा गेला नाही की जोपर्यंत तो जात नाही तोपर्यंत नाकी नऊ यायचे.

उशिरा येण्याच्या कारणावरून बॉसने झापलंय? मग ही बातमी दाखवा..

कधी कधी उसवलेल्या कपड्यांना टाके घालताना नेमकी सुई धाग्यात जात नाही तेव्हा ‘माझ्या मेलीचा धागा काय फटक्यात सुईत जायचा नाही’ अशी कुरकूरही अनेकींकडून ऐकून येते. मग मला जरा सुईत धागा ओवून दे रे बाबा असे फर्मान निघतात. थोडक्यात काय तर नाकासमोर सुई धरून तिच्यात पहिल्याच प्रयत्नात धागा ओवायचा म्हणजे कधी कधी एखादीचा जीव रडकुंडीला येतो. आता तुम्हालाही असे अनुभव येत असतील तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहाच. नाकासमोर सुई न धरता एका फटक्यात सुईत धागा कसा ओवायचा याचं प्रात्यक्षिक यात दाखवलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर आयुष्यभर आपण चुकीच्या पद्धतीनं तर धागा ओवत नव्हतो ना असा प्रश्न आल्यावाचून राहणार नाही हे नक्की.

Viral Video : अरेच्चा! इतकी वर्षं आपण चुकीच्या पद्धतीने सुईत धागा ओवतोय?

https://twitter.com/JohnBick4/status/980942639808811009

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Watch video you have been threading needles wrong

ताज्या बातम्या