मुंबई पोलीस म्हटले की, डोळ्यांसमोर येतात त्या त्यांच्या वर्दीचा धाक, शिस्त व नियम या गोष्टी. मुंबई पोलीस पावसाळा असो किंवा उन्हाळा नागरिकांच्या सेवेत सदैव हजर असतात. तसेच मुंबई पोलीस सोशल मीडियाच्या ट्रेंडमध्येसुद्धा अनेकदा सहभागी होताना दिसतात. आज मुंबई पोलिसांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात एखाद्या ट्रेंडप्रमाणे नागरिकांप्रति त्यांनी कर्तव्ये सांगितली गेली आहेत. हा व्हिडीओ सध्या अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

‘वी आर मुंबई पोलीस ‘ (We Are Mumbai Police) असे म्हणत त्यांनी हा ट्रेंड सुरू केला आणि एकेक करून प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने वाहनचालकांची काही गुपिते सांगितली. तर काही पोलीस अधिकारी त्यांच्या जबाबदाऱ्या सांगताना दिसले. एकदा पाहाच मुंबई पोलिसांनी कशा प्रकारे हा ट्रेंड सादर केला आहे.

हेही वाचा…VIDEO : चिमुकलीचा अनोखा विक्रम! उचलते चक्क ७५ किलो वजन, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही आहे नोंद

व्हिडीओ नक्की बघा :

व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, महिला ट्रॅफिक पोलीस येतात आणि म्हणतात की, आम्ही मुंबई पोलीस आहोत आणि आम्हाला माहीत आहे की, तुम्ही आम्हाला बघितल्यानंतरच हेल्मेट घातले आहे. तसेच दुसरे ट्रॅफिक पोलीस येतात आणि म्हणतात, आम्हाला माहीत आहे की तुम्ही तुमचं लायसन्स पहिल्यांदाच विसरला नाही आहात. नंतर एकेक करून पोलीस अधिकारी येतात आणि म्हणतात, महिलांची सुरक्षा हेच आमचे पहिलं प्राधान्य आहे आणि अर्थातच मुंबई नेहमी सुरक्षित राहील याची आम्ही काळजी घेत असतो. आम्ही मुंबई पोलीस आहोत अर्थातच आम्ही तुम्हाला संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका याची वारंवार आठवण करून देत असतो. तसेच व्हिडीओच्या शेवटी ‘मुंबई पोलीस सर्व मुंबईकरांवर प्रेम करतात आणि सर्व मुंबईकर आमच्यावर’, असेसुद्धा सांगताना दिसून आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुम्ही मुंबईकर आहात आणि अर्थातच आपत्कालीन परिस्थिती आल्यावर तुम्ही १०० क्रमांक डायल करू शकता,” अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे. @mumbaipolice यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून नेटकरी विविध शब्दांत मुंबई पोलिसांवर असणारे त्यांचे प्रेम कमेंट्समध्ये व्यक्त करताना दिसून आले आहेत. तसेच एका युजरने कमेंट केली आहे, “इन्स्टाग्राम ॲपवरील हे माझं सगळ्यात आवडतं अकाउंट आहे.” मुंबई पोलीस नेहमीच त्यांच्या अनोख्या स्टाईलमध्ये नागरिकांच्या सुरक्षेबद्दल वेळोवेळी सांगत असतात हे आज पुन्हा एकदा या व्हिडीओतून दिसून आले आहे.