Viral Video: नवरा आणि बायको म्हटलं तर वाद हे होतातच. परंतु, कधी कधी या छोट्या छोट्या भांडणातूनच मोठ्या वादाचा भडका उडतो. दरम्यान, आता एका पती-पत्नीचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात ते दोघेही एकमेकांवर रागावलेले दिसत आहेत.
पती-पत्नीमध्ये लहान-मोठ्या गोष्टींवरून भांडणं होणं फार मोठी गोष्ट नाही. असं म्हणतात की, लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस वधू-वरांसाठी खूप खास असतात. या दिवसांमध्ये दोघेही एकमेकांशी प्रेमानं, आपुलकीनं बोलतात. पण, लग्न जसं जुनं होतं, तसे दोघांमध्ये वाद सुरू होतात. प्रत्येक जोडप्यामध्ये या सर्व गोष्टी सामान्य आहेत. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लग्न सुरू असतानाच वधू-वरामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लग्न समारंभामध्ये वधू-वरामध्ये कोणत्या तरी कारणावरून अचानक वाद सुरू होतो. यावेळी वर वधूच्या कानाखाली मारतो, त्यानंतर पत्नीदेखील त्याला मागे ढकलते. यावेळी आसपास असलेले लोक त्यांच्यातील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते दोघेही कोणाचे काहीच ऐकत नाहीत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ युट्यूबवरील @HOODRICH1996 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “काय झालं असेल यांच्यात नक्की.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “बापरे लग्नाआधीच भांडण”
