Wedding Video: काही दिवसांपासून लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये नववधू आणि नवरदेवांचे अनेक पारंपरिक प्रसंग किंवा अनेक किस्से कॅमेऱ्यात कैद होत असल्याचे दिसतात. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल खूप पसंत केले जातात. असाच लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्न हे दोन व्यक्तींमधील पवित्र नाते आहे. लग्नबंधनात अडकलेल्या दोन व्यक्ती त्यांचे संपूर्ण आयुष्य एकत्र घालवतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका लग्नाचा आहे; पण हे लग्न इतर लग्नांपेक्षा खूप वेगळे आहे. कारण-यात असा प्रकार घडलाय; जो पाहून लोक खूप आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

लग्नकार्यामध्ये वराने वधूच्या कपाळी कुंकू लावण्याचा विधी असतो. या विधीनंतर लग्न पूर्ण झाल्याचे मानतात. तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये हे दृश्य बघितले असेल; पण नवऱ्या मुलाने नवरीच्या कपाळी कुंकू लावण्याआधी दुसऱ्याच कोणीतरी तिच्या कपाळी कुंकू भरले तर? ऐकायला विचित्र वाटतेय ना? लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण असतो. मात्र, अनेकदा लग्नविधी सुरू असताना असे काही घडते, की क्षणात हा आनंद दुःखात बदलून जातो. आता लग्नाचे असेच आणखी एक अजब प्रकरण समोर आले आहे.

an old lady dance on 90s famous song
90’s च्या गाण्यावर आजीने केला भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल
a man beating innocent dog in a moving lift
VIDEO : बापरे! लिफ्टमध्ये कुत्र्याला अमानुषपणे मारहाण, सीसीटिव्ही फुटेज व्हायरल; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
a husband put sticker on bike for wife
“सॉरी गर्ल्स, माझी पत्नी खूप..” दुचाकीवर नवऱ्याने लावले असे स्टिकर; व्हिडीओ होतोय व्हायरल
dance video
आयुष्य एकदाच मिळतं, फक्त मनभरून जगता आलं पाहिजे! वयाच्या नव्वदीत आजीने केला भन्नाट डान्स, ऊर्जा पाहून व्हाल थक्क
Kareena Kapoor Khans wax figure a woman first reaction goes viral on social media
VIDEO : करीना कपूरला पाहताच महिलेनी केले असे कृत्य…; व्हिडीओ होतोय व्हायरल
cat and rats true friendship
टॉम अँड जेरी! कधी प्रेम तर कधी राग; मांजर उंदराची अनोखी मैत्री, पाहा व्हायरल VIDEO
ola electric scooter driving in sea viral
“भाऊपण ओला, स्कूटरपण Ola…” या ‘नेक्स्ट लेव्हल टेस्टिंग’चा Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण!
Puneri Patya Video
Puneri Patya : “… अन्यथा मत मिळणार नाही” पुणेरी पाट्यांचा विषय जगात भारी, पाहा व्हायरल VIDEO

लग्नाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आलाय. वधूच्या भांगेत कुंकू भरताना जे काही घडले ते सर्वांना चकित करणारे होते. या क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडीओमध्ये दाखविण्यात आलेय की, कुठेतरी लग्नकार्य सुरू आहे. मुलगा-मुलगी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. इतक्यात कोणीतरी येतो आणि नवरीचे कपाळ कुंकवाने भरतो.

(हे ही वाचा : चक्क धक्का देऊन कर्मचाऱ्यांनीच रेल्वेला केलं बाजुला; VIDEO पाहून तुमचाही बसणार नाही विश्वास)

खरे तर मिळालेल्या माहितीनुसार, लग्न सुरू असताना अचानक त्याच नवरीचा प्रियकर हेल्मेट घालून येतो. स्टेजवर जाऊन तो नवरदेवाला जोरात बाजूला ढकलतो आणि मग नवरीच्या भांगात कुंकू भरतो. एवढेच नाही, तर तो नवरीलाही त्याच्यासोबत नेण्यासाठी येतो. लग्नाला उपस्थित असलेले लोक हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. वधू आपल्या जुन्या प्रियकराची ही कृती पाहून रडू लागते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

येथे पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ krishnathakre278 नावाच्या युजरने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, वधूच्या कपाळावर कुंकू लावणारी व्यक्ती म्हणजे तिचा जुना प्रियकर आहे. हा व्हिडीओ जवळपास नऊ लाख लोकांनी तो पाहिला आहे आणि ५२ हजार लोकांनी त्याला लाइक केले आहे. या व्हिडीओवर मोठ्या संख्येने लोक कमेंट्स करीत आहेत. लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअरही करीत आहेत.