वीकेंड म्हणजे मस्त उशिरा उठणे, एक कप चहा किंवा कॉफी बनवणे आणि आपल्या आवडत्या खूर्चीवर बसून आराम करणे. यावेळी काहीजण पुस्तक वाचून स्वत:चं मनोरंजन करतात तर काही जण छान गाणी ऐकणे पसंत करतात. तुम्ही जर यातील दुसऱ्या कॅटेगिरीत मोडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. आम्ही तुमच्यासाठी एक खास गाण्याचा व्हिडीओ घेऊन आलोय. हा गाण्याचा व्हिडीओ स्वत: उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलाय. आनंद महिंद्रा नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतात, मात्र आज शेअर केलेला व्हिडीओ पाहून नक्कीच तुमच्या विकेंडची सुरुवात कमाल होईल.

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या प्रोफाईलवरुन एका गाण्याचा व्हिडीओ शेअर केलाय. हे गाणं ऐकून तुमची सकाळ एकदम फ्रेश होईल. या गाण्यामध्ये भारतातील विविध 51 नद्यांच्या नावाचा समावेश आहे. देशाच्या विकासात ज्या नद्याचं योगदान आहे. त्या नद्यांच्या नावाचा उल्लेख करत हे गाणं सादर करण्यात आलंय. हे गाणं आपल्या देशातील नद्यांच्या सौंदर्याची, आपल्याकडे असलेल्या मौल्यवान संसाधनांची जाणीव करुन देते. हा गाण्याचा व्हिडीओ 2021 मध्येच आला होता. हा व्हिडिओ जलस्रोतांचे जतन आणि संरक्षणाच्या गरजेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी तयार केला आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा- वंदे भारत एक्सप्रेसचा नवा व्हिडीओ आला समोर, पियुष गोयल यांनी शेअर करत म्हटलं…

नदी जशी संथ वाहते तसं तुमच्यामधूनही संगीत वाहुद्या

हा व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी नदी जशी संथ वाहते तसं तुमच्यामधूनही संगीत वाहुद्या, व्हिडीओ पाहा आणि विकेंडचा आनंद घ्या, असं कॅप्शन लिहलं आहे. या ट्विटला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 3 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी आनंद महिंद्रा यांची पोस्ट खूप आवडली आहे. काहींनी हे गाणं शेअर केल्याबद्दल आनंद महिंद्राचे आभारही मानले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.