Viral video: जंगलात असे काही धोकादायक प्राणी आहेत, त्यांच्या आजूबाजूला भटकणे सोडा, कोणाला त्यांच्या नजरेत यायलाही भीती वाटते. धोकादायक प्राण्यांची भीती फक्त जंगलातील इतर प्राण्यांनाच वाटत नाही, तर त्यांची भीती माणसांमध्येही दिसते. कारण हे प्राणी क्षणात समोरच्या व्यक्तीला संपवू शकतात एवढी ताकद त्यांच्यात असते. मात्र, अनेकवेळा या भयंकर प्राण्यांचे दुसरे रूप पाहायला मिळते ज्याची कुणालाही अपेक्षा नसते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वाघ कुत्र्यावर प्रेम करताना दिसत आहे. वाघाची आणि कुत्र्याची ही अनोखी मैत्री पाहून सगळेच थक्क झाले आहेत. यांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वाघ हा धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे, ज्याला पाहून इतर प्राणीही थरथर कापू लागतात. पण वाघाला पाहून ना कुत्रा घाबरला ना वाघाने कुत्र्यावर हल्ला केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या दोघांकडे पाहून त्यांच्यात खूप घट्ट मैत्री असल्याचे दिसून येते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोघेही एकमेकांवर प्रेम करताना दिसत आहेत. वाघाच्या मांडीवर कुत्रा बसला आहे.

वाघ आणि कुत्र्याची घट्ट मैत्री

वाघाला घाबरण्याऐवजी कुत्राही त्याच्या सहवासाचा आनंद घेत आहे. सहसा असे दृश्य दिसत नाही. कारण वाघ नेहमी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात. मात्र, या व्हिडिओमध्ये दिसणारे वाघ आणि कुत्रा दोघेही निवांत बसले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘अपनी गली में कुत्ता भी शेर होता है’; चक्क कुत्र्यानेच जबड्यात धरले मगरीचे तोंड, पाहा थरारक VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडिओमध्ये कुत्रा आणि वाघ यांच्यातील मैत्री पाहून युजर्सही हैराण झाले आहेत. एका युजरने म्हटले की, ‘कुत्रा खूप आनंदी दिसत आहे’. तर दुसरा म्हणाला, ‘मला वाटतं कुत्रा घाबरला आहे.’ त्याला तिथून पळून जायचे आहे. आणखी एका युजरने म्हटले की, ‘ही खूप धोकादायक मैत्री आहे.’