करोना व्हायरसमुळे मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे काही टक्के नुकसानही होत आहे. जिथे ते एकत्र शाळेत जायचे, तिथेच आता त्यांचे आयुष्य घरात कैद झाले आहे. महामारीच्या काळात कधी शाळा उघडतात तर कधी बंद होतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या समस्या सांगणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नक्की काय आहे व्हायरल फोटोमध्ये?

व्हायरल होत असलेल्या फोटोत एका मुलाने करोना आणि न्यूटनचा चौथा नियम आणि महान शास्त्रज्ञ न्यूटनचा प्रसिद्ध चौथा नियम (Newton’s Fourth Law) यांचा नियम मिक्स करून एक वेगळा अॅगल तयार केला आहे. मुलाची सर्जनशीलता पाहून इंटरनेटवर लोक खूप प्रभावित होत आहेत. याबाबत ते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक त्या मुलाला बाल वैज्ञानिकही म्हणत आहेत.

(हे ही वाचा: कोविडचा नवा प्रोटोकॉल पाहून व्हाल हैराण! IPS अधिकाऱ्यांनी शेअर केलेला फोटो होतोय Viral)

विद्यार्थ्याची क्रिएटिविटी

व्हायरल होत असलेल्या फोटोमधल्या विद्यार्थ्याच्या क्रिएटिविटीचे उत्तर नाही. हा फोटो एका विद्यार्थ्याच्या नोटबुकचे आहे, ज्यामध्ये एका मुलाने न्यूटनचा चौथा नियम स्वतःच्या मते समजावून सांगितला आहे. कोविडला केंद्रस्थानी ठेवून लेखाची सुरुवात केली आहे. मुलाने लिहिलं आहे- ‘जेव्हा करोना वाढतो तेव्हा शिक्षण कमी होते आणि करोना कमी झाला की शिक्षण वाढते. म्हणजेच, करोना अभ्यासाच्या व्यस्त प्रमाणात आहे. हे विद्यार्थ्याने एका सोप्या फॉर्म्युल्याच्या रूपात समोर ठेवले आहे.

(हे ही वाचा: Viral News: पोटातला गॅस विकून दर आठवड्याला ३७ लाख रुपये कमवणं पडलं महागात, व्यवसाय बंद करण्याचा घेतला निर्णय)

IAS अधिकाऱ्यांनी शेअर केला फोटो

व्हायरल होत असलेला हा फोटो IAS अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला ११ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे आणि १.४ हजारांहून अधिक वेळा रिट्विट केले गेले आहे. यासोबतच अनेक युजर्सनी यावर कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का? )

(हे ही वाचा: अन् तो वाघाच्या मागे चालू लागला…; हा Viral Video एकदा बघाच!)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

फॉर्म्युलावर प्रतिक्रिया देताना यूजर्सनी मजेदार गोष्टी सांगितल्या आहेत. फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘किती अद्भुत लोक आहेत आमच्याकडे..! तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘या बाल वैज्ञानिकाला सलाम.’ काही युजर्सनी तर विद्यार्थ्याला नोबेल पारितोषिक देण्याची मागणीही केली.