Independence Day 2022: यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा साजरा केला जाणार आहे. देशभरात मोठ्या उत्साहात १५ ऑगस्ट साठी म्हणजेच स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा या अभियानाची घोषणा करताच देशविदेशातील भारतीयांच्या सोशल मीडियावर तिरंगा झळकताना दिसत आहे. याच तिरंग्याच्या बाबत सोशल मीडियावर एक प्रश्न सध्या बराच ट्रेंड मध्ये आहे आणि तो म्हणजे स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणात नेमका फरक काय? वास्तविक या दोन्ही दिवशी ध्वजारोहणाच्या दिशेपासून ते प्रथेपर्यंत अनेक फरक आहेत.

ऑनलाईन चर्चेनुसार यासंदर्भात एक प्रश्न UPSC च्या मुलाखतीत विचारला गेला होता त्यावेळी सर्वांचेच धाबे दणाणले होते आणि केवळ दोघांना हे उत्तर देता आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी ध्वजावंदनात असतो ‘हा’ मोठा फरक

  • स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणात ध्वज दोरीच्या मदतीने खालून वरच्या दिशेने खेचून मग तो उघडला जातो.
  • प्रजासत्ताक दिन म्हणजे २६ जानेवारीला ध्वज बांधतानाच ध्वज स्तंभाच्या वरील बाजूस बांधला जातो आणि थेट फडकावला जातो.
  • स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजवंदनाला ध्वजारोहण असे म्हंटले जाते तर प्रजासत्ताक दिनी ध्वज फडकावला असे म्हंटले जाते.
  • स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते तर प्रजासत्ताक दिनी देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज फडकावला जातो.
  • स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर प्रजासत्ताक दिनाला राजपथावर ध्वज फडकावला जातो.

दरम्यान, अनेक देशप्रेमींना सुद्धा प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनामधील फरक ठाऊक नसतो. अगदी तारखेपासूनही अनेकांचे गोंधळ होतात. त्यामुळे एक साधी गोष्ट लक्षात ठेवा १५ ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आणि २६ जानेवारी हा देशाचा प्रजासत्ताक दिन आहे. हे दोन्ही भारताचे राष्ट्रीय सण आहेत मात्र या दोन्ही दिवसाचा इतिहास वेगळा आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश पारतंत्र्यातून मुक्त झाला होता तर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अंमलात आणले गेले होते.