साप, अजगर म्हटलं तरी आपल्या अंगावर काटा येतो. पावसाळ्यात साप आढळण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे अनेकदा सांपाचे व्हिडिओ व्हायरल होतात तर कधी अजगराच्या शिकारीचे व्हिडिओ व्हायरल होतात जे पाहून काळजाचा थरकाप उडतो. दरम्यान, झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातील बालेडिहा गावाजवळ झालेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये एका मोठ्या अजगराने एका कोल्ह्याला गिळले. ही घटना बुधवारी सरिया पोलिस स्टेशन हद्दीतील जंगलात घडली.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गुरे चरण्यासाठी जंगलात गेलेल्या स्थानिकांना हा अजगर शिकार गिळताना आढळला. सापाला शिकार करताना पाहून घाबरलेल्या ग्रामस्थांचा गोंधळ उडाला होता आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेचा व्हिडिओ, जो आता व्हायरल झाला आहे, तो ब्रूट इंडियाने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अजगराने कोल्ह्याला अर्धा गिळलेले दिसत आहे. घटनास्थळी असलेल्या अनेक लोकांनी हे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद केले.
व्हिडिओ पहा:
पोस्टच्या कॅप्शननुसार, अजगरांच्या आकारानुसार त्यांच्या खाण्याच्या सवयी आश्चर्यकारकपणे मंदगतीने होतात.: “लहान अजगर दर ५-१० दिवसांनी अन्न खातात, लहान-प्रौढ (sub-adults) दर १०-१४ दिवसांनी किंवा ३-४ आठवड्यांनी एकदा अन्न खातात, मोठे( large adults) प्रौढ अजगर क्वचितच दर एक ते दोन महिन्यांनी एकदा अन्न खातात.” असे त्यात म्हटले आहे.
अजगर शिकार केल्यानंतर भक्ष्याला हळू गळू गिळतो. एखादे भक्ष्य गिळण्यासाठी त्याला साधारण काही मिनिटे किंवा काही तास लागू शकतात आणि ते पूर्णत: भक्ष्याच्या आकारावर अवलंबून असते.
नॅशनल जिओग्राफिकने साप त्यांच्या डोक्याच्या आकारापेक्षा ते कितीतरी मोठे प्राणी कसे खातात हे स्पष्ट केले आहे. अजगराचे लिंगामेंट्स (प्राण्यांच्या शरीरातील एक ऊती जी हाडांना जोडते) लवचिक असतात. अजगर त्यांच्या कवटीच्या हाडांची स्वतंत्रपणे हालचाल करू शकतात त्यामुळे त्यांचे जबडे इतके उघडू शकतात की,”ते शिकार त्याच्या सहज घशात घालू शकतात.”
व्हिडिओ पाहून ऑनलाइन प्रतिक्रियांची लाट उसळली. “त्याला शांतपणे खाऊ द्या,” एका वापरकर्त्याने कमेंट दिली. “अशा प्रकारामुळे अजगर नक्कीच घाबरला असता, त्यामुळे त्याचे तोंडातून अन्न पुन्हा बाहेर पडले असते!”
ही पहिलाच घटना नाही. या पूर्वी २०२४ मध्ये, उत्तर प्रदेशातील आग्रा येथील पराणा गावाजवळ १६ फूट लांबीच्या अजगराने एका वासराला गिळंकृत केले होते. मेंढपाळांना हा साप सापडला होता ज्यामध्ये वासराचे जवळपास अर्धे शरीर सापाच्या तोंडात अडकले होते.