scorecardresearch

RIP म्हणजेच ‘रेस्ट इन पिस’चा उगम नेमका झाला कुठून?; त्यामागील नेमका अर्थ काय?

एखाद्याचे निधन झाल्यानंतर लोकं RIP या शब्दाद्वारे आपले दुःख व्यक्त करतात.

बहुतेक लोकांना या शब्दाचा अर्थ पूर्णपणे माहित नाही. (Photo : Pexels)

बऱ्याचदा लोकं एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ‘RIP’ या शब्दाचा वापर करतात. आरआयपी हा शॉर्टफॉर्म असला तरी आता तो शब्द म्हणून सर्रास वापरला जात आहे. बर्‍याच जणांना या शब्दाचा नेमका अर्थ आणि पूर्ण रूप देखील माहित नाही, परंतु एखाद्याचे निधन झाल्यानंतर ते या शब्दाद्वारे आपले दुःख व्यक्त करतात.

कदाचित काही लोकांना त्याचा अर्थ माहित असेल, परंतु बहुतेक लोकांना या शब्दाचा अर्थ पूर्णपणे माहित नाही. आज आपण जाणून घेऊया या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे. याशिवाय हा शब्द कधी आणि कसा सुरू झाला, याबद्दलही आपण आज जाणून घेणार आहोत. तुम्ही पाहिले असेलच की बरेच लोक एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मेसेजमध्ये RIP ला ‘Rip’ लिहितात. हा ‘रिप’ म्हणजे कट करणे.

हरवलेल्या बॅगसाठी Air IndiGo ची वेबसाईट केली हॅक; लोक म्हणाले, “वो इंजिनियर है वो…”

RIP एक संक्षिप्त रूप आहे. त्याचे पूर्ण रूप ‘Rest In Peace’ असे आहे. खरंतर, ‘रेस्ट इन पिस’ची उत्पत्ती लॅटिन वाक्यांश ‘Requiescat In Pace’ पासून झाली आहे. ‘रेक्विएस्कॅट इन पिस’ म्हणजे ‘शांततेने झोपणे’. या शब्दाचा मराठीतील अर्थ ‘आत्म्यास शांती लाभो’ असा आहे. ख्रिस्ती धर्मात असे मानले जाते की मृत्यूनंतर ‘आत्मा’ शरीरापासून वेगळा होतो आणि ‘जजमेंट डे’च्या दिवशी दोघे पुन्हा एकत्र येतात.

‘रेक्विएस्कॅट इन पिस’ बद्दल असे म्हटले जाते की चर्चच्या शांततेत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचा आत्मा येशू ख्रिस्ताशी जुळतो. RIP या शब्दाचा वापर १८ व्या शतकातील असल्याचे मानले जाते. याआधी ५ व्या शतकात मृत्यूनंतर कबरीवर ‘रेक्विएस्कॅट इन पिस’ असे शब्द सापडले आहेत. ख्रिश्चन धर्मात या शब्दाचा वापर वाढला. यानंतर हा शब्द जागतिक झाला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Where exactly did rip rest in peace originate what exactly does it mean pvp

ताज्या बातम्या