सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे नवे केंद्र बनले आहे. येथे दररोज नवीन मनोरंजक पोस्ट जगाला आश्चर्यचकित करतात. त्याच वेळी, सोशल मीडियावर असे मजेदार कोडे येतात की युजर्स हैराण होतात. असाच एक मजेशीर फोटोला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. जाणून घेऊया काय आहे प्रश्न आणि उत्तर कुठे दडले आहे.

गायी दोन पण डोकं एक? काय आहे प्रकरण

हे कोडे इंस्टाग्रामवर Unseen Illusion नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आले असून फोटोमध्ये दोन गायी दिसत आहेत. दोघेही एकमेकांच्या जवळ उभ्या आहेत, पण गंमत म्हणजे फोटोत फक्त एकाच गायीचे डोके दिसत आहे. आता पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने प्रश्न विचारला आहे की समोर दिसणारे डोके कोणत्या गाईचे आहे. हे कोडे सोडवण्यात लोकांना खूप मजा येत आहे. नीट पाहिल्यानंतरही लोक उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत, कारण कधी A गायीचे डोके आहे असे वाटते तर कधी बी गायीचे डोके आहे असे वाटते. अशा परिस्थितीत गोंधळात पडण्यासोबतच युजर्सला मजाही येत आहे.

हेही वाचा – तुम्ही ५ सेंकदात फोटोमधील मांजर शोधू शकता का? 99 टक्के लोकांना सापडले नाही उत्तर….

नक्की डोकं कोणत्या गाईच?

या पोस्टला अनेकांनी पसंती दर्शवली असून लोक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही लोकांनी हे A चे डोके सांगितले आहे, तर बरेच लोक B चे डोके आहे असेही सांगत आहेत. काही लोकांनी तर दोघेचीही डोकी असल्याचे कमेंटमध्ये लिहिले आहे. सध्या ते कोडे सोडवणे अवघड वाटते आहे. जर तुम्हाला या फोटोचे उत्तर मिळाले, तर तुम्ही बिनधास्त तुमची बुद्धिमत्ता दाखवू शकता. मात्र, त्यात एक गाय आणि बैल असून हे बैलाचे डोके असल्याचेही काही लोकांनी कमेंटमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा – ५ तास रिक्षा चालवून मिळाले फक्त ४० रुपये, रिक्षाचालकाला कोसळले रडू, Viral Videoमध्ये सांगितली व्यथा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चला तर मग आता आम्ही तुम्हाला याचे उत्तर सांगतो. जर तुम्ही हे चित्र नीट पाहिलात तर तुम्हाला समजेल की डोक्याचा रंग B गायीच्या रंगाशी जुळत आहे, याचा अर्थ उत्तर B देखील असू शकते.