Who is Rayyan Arkan Dhika : इंडोनेशियातील एका छोट्याशा गावातील ११ वर्षांच्या मुलाने असा डान्स केला की साऱ्या जगाला त्याने वेड लावले. पारंपारिक पाकू जलूर महोत्सवादरम्यान, रायान अर्कान ढिका(Rayyan Arkan Dhika) नावाच्या या मुलाने स्थानिक महोत्सवादरम्यान एका लांब, वेगवान बोटीच्या समोरील टोकावर उभा राहून अगदी स्वॅग दाखवत केलेल्या त्याच्या उत्साहपूर्ण डान्सने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने इतका अप्रतिम डान्स केला की लोक फक्त बघतच राहिले. नेटकऱ्यांना त्याचा डान्स इतका आवडला की लोक त्याचे चाहते झाले आहे. अनेकांनी त्याच्या प्रमाणे डान्स करत व्हिडिओ पोस्ट केले. पण कोणीही त्याच्यासारखा डान्स करू शकत नाही. त्याचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

११ वर्षांच्या डान्सर रेयानने जगाची मन जिंकले

ढिका हा रियाऊ येथील पारंपारिक पाकू जलूर महोत्सवाचा भाग होता, जिथे तो शर्यती उतरलेल्या नावेच्या टोकावर उभे राहून आत्मविश्वासाने नाचत होता. रायनने पारंपारिक तेलुक बेलंगा पोशाख(Telugu Belanga Costume) आणि मलय रियाउ हेडक्लॉथ (Malay Riau Headcloth) परिधान केले होते आणि डोळ्यांवर काळा गॉगल चढवला होता. तो बोटीच्या पुढच्या भागात उभा होता, जिथे संतुलन राखून उभे राहणे कठीण आहे, पण रायन तिथे अचूकपणे संतुलन राखून उभा राहतो आणि नाचतो देखील. त्याच्या या डान्सने सर्वांचे मन जिंकत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही हावभाव दाखवत नाही. तो दोन्ही हात हवेत उडवत आणि नंतर त्याचे हात गोलाकार हालचालीत फिरवतो. जे एखाद्या व्यावसायिक नर्तकालाही आश्चर्यचकित करू शकते. डान्स कितीही सोपा वाटत असला तरी ज्या पद्धतीने रेयानने तो सादर केला आहे त्यामध्ये त्याची स्वत:ची शैली दिसून येते.

नावेच्या टोकावर उभा राहून नाचतो हा चिमुकला

नावेच्या स्पर्धेतील रियानच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना, ढिकाने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी स्वतः हा डान्स तयार केला. तो अगदी आपोआप होता. माझे मित्र जेव्हा जेव्हा मला पाहतात तेव्हा ते म्हणतात, ‘तू व्हायरल होणार आहेस’.” त्याच्या या निरागसतेने आणि प्रतिभेने लोकांना वेड लावलं आहे, या व्हिडिओला ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

एका वापरकर्त्याने लिहिले, “मी सर्व व्हिडिओ पाहिले आहेत, पण काळ्या कपड्यांमध्ये हा मुलगा सर्वोत्तम आहे.” त्याची लय कमाल आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “असा समतोल राखणे अशक्य वाटते.”

“तो चांगल्या वायुगतीसाठी वाऱ्याची दिशा दाखवत आहे,” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.

पॅरिसपासून हॉलीवूडपर्यंत चिमुकल्याच्या डान्सची चर्चा

फ्रेंच फुटबॉल क्लब पीएसजीनेही त्याचा डान्स कॉपी केला आणि शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की.त्याचा ऑरा पॅरीसपर्यंत पोहचला हे. हा व्हिडिओ १० दिवसांत ७० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. एनएफएल स्टार आणि टेलर स्विफ्टचा बॉयफ्रेंड, ट्रॅव्हिस केल्से यांनीही त्याचे गाणे पोस्ट केले आहे, जे आतापर्यंत १४ दशलक्ष व्ह्यूजपेक्षा जास्त झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका छोट्या गावातील एका मुलाने जगाला दाखवून दिले की, हिरो होण्यासाठी त्याला स्टेज किंवा मोठ्या नावाची गरज नाही.