अन्न हे पुर्णब्रह्म! या वाक्याप्रमाणे अन्न हा आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. कोणतेही काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज असते आणि शरीराला ऊर्जा अन्नपदार्थांमधून मिळते. त्यामुळे आपल्याला वेळच्या वेळी जेवणे गरजेचे असते. आपल्याला जेवणासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते किंवा स्वतः जेवण बनवणे शिकावे लागते. जेवण बनवण्याचे शिकत असताना अनेक गमतीजमती घडतात, याचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जेवण बनवत असल्याचे दिसत आहे. त्याने गॅसवर चमचा धरल्याचे दिसत आहे. बाजुला असणाऱ्या टोपामध्ये या चमचाद्वारे फोडणी देणार असल्याचा अंदाजे जाणवते. पण तो तेव्हा ते तेल टोपामध्ये टाकतो, तेव्हा संपूर्ण टोपच पेट घेतो. हा भयंकर प्रकार अंगावर काटा आणणारा आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: डॉक्टराची इंजेक्शन देण्याची पद्धत पाहिली का? लहान मुलंही होत आहेत आनंदाने सहभागी, पाहा Viral Video

व्हायरल व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by amara ram (@flurtingboy)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओमधील फोडणी देण्याची अनोखी पद्धत पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झाले असून, त्यांनी कमेंट्समध्ये यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्हिडीओला १४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.