Viral Video : संस्कार हे सर्वात मोठी शिकवण आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर व्यक्तीचे संस्कार योग्य मार्ग दाखवते आणि व्यक्तिमत्वाचा विकास करते. संस्कारामुळे व्यक्तीला चांगले विचार करण्याची क्षमता, वागणूक आणि चांगली जीवनशैली प्राप्त होते. असं म्हणतात बालमनावर रुजवलेले संस्कार आयुष्यभर लक्षात राहतात त्यामुळे लहानपणी मुलांवर चांगले संस्कार करणे अतिशय महत्त्वाचे असते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली कपड्याच्या दुकानातील पुतळ्याच्या (मॅनेक्विन) पाया पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. चिमुकलीच्या या कृतीने सर्वांचे मन जिंकले आहे. तिच्यावर सध्या नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहे.

चिमुकली कपड्याच्या दुकानातील पुतळ्याच्या पाया पडत होती

हा व्हायरल व्हिडीओमध्ये एका कपड्याच्या दुकानातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकली कपड्यांचे प्रदर्शन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मानवी आकाराच्या पुतळ्यांचे म्हणजेच मॅनेक्विनच्या पाया पडताना दिसत आहे. ती प्रत्येक मॅनेक्विनजवळ जाते आणि खाली वाकून त्यांच्या पायांना स्पर्श करत पाया पडताना दिसते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या चिमुकलीवर तिच्या आईवडिलांनी खूप चांगले संस्कार केल्याचे दिसत आहे. नेटकऱ्यांनी तिचे व तिच्या आईवडिलांचे कौतुक केले आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

sankhesonali या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या चिमुकलीच्या आईने हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ज्या आईवडिलांनी तिला एवढे चांगले संस्कार दिले, त्यांना सलाम” तर एका युजरने लिहिलेय, “किती सुदंर तिला करू द्या” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप संस्कारी मुलगी आहे” एक युजर लिहितो, “चांगले संस्कार मिळत आहे, हा त्याचा पुरावा आहे” तर एक युजर लिहितो, “संस्कारी आहे. आईवडिलांनी चांगल्या सवयी लावल्या आहेत.” आणखी एक युजर लिहितो, “किती निष्पाप, याला संस्कार म्हणतात” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. अनेकांनी मुलीवर आईवडिलांनी चांगले संस्कार केल्याचे सांगत संस्काराचे महत्त्व सांगितले आहे.