गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत आहे. आजच सोलापूरमधल्या बार्शी या ठिकाणी गौतमी पाटीलच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. आयोजक राजेंद्र गायकवाड यांनीच ही तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाविषयी संपूर्ण माहिती घेऊनच मी माझी भूमिका मांडेन असं गौतमी पाटीलने म्हटलं आहे. मात्र सबसे कातील गौतमी पाटील असं का म्हटलं जातं? या प्रश्नाचं उत्तरही गौतमीने दिलं आहे.

काय म्हटलं आहे गौतमी पाटीलने?

“सबसे कातील गौतमी पाटील असं माझ्याविषयी म्हटलं जातं हे प्रेक्षकांचं प्रेम आहे. मला या गोष्टीचं खूप समाधान वाटतं, छान वाटतं. माझ्या कार्यक्रमांना आता महिला वर्गही येऊ लागला आहे याचंही बरं वाटतं. प्रेक्षकांनी मला प्रेम दिलं. सबसे कातील गौतमी पाटील असं माझ्याविषयी कायमच ते बोलत असतात. हे सगळं माझ्याविषयीच्या प्रेमापोटीच. या प्रेक्षकांनीच मला इथपर्यंत आणलं आहे. हे त्यांचेच उपकार आहेत.” असं म्हणत गौतमीने याबाबत उत्तर दिलं आहे.

राजकारणात येणार नाही

मला कुठल्याही राजकारणात यायचं नाही. मी कलाकार आहे. मी माझी कला सादर करत राहणार आहे असं गौतमीने म्हटलं आहे. तसंच गौतमीने प्रेक्षकांनाही महत्त्वाचं आवाहन केलं. “माझं सगळ्या प्रेक्षकांना एवढंच सांगणं आहे की, तुम्ही एवढ्या लांबून माझ्या कार्यक्रमाला येत असतात, तुमचं माझ्यावर प्रेम आहे. माझं एकच म्हणणं आहे, प्रत्येक कार्यक्रमाला वाद होत नाहीत. थोडंफार होतं. पण ते पुढे वाढवलं जातं. त्यामुळे काहीतरी चर्चा होते. कार्यक्रमाला या, कार्यक्रम एन्जॉय करा आणि शांतपणे घरी”, असं आवाहन गौतमी पाटील हिने केलं. टीव्ही ९ मराठीला गौतमी पाटीलने एक छोटी मुलाखत दिली. त्यामध्ये तिने हे वक्तव्य केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाद वाढले आहेत हे मी पण पाहते आहे

गेल्या काही दिवसांपासून मी पाहते आहे की माझ्यावरुन वाद होतात. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या प्रत्येक कार्यक्रमावरून वाद होत नाही. काहीतरी छोटं-मोठं घडतं. ते वाढवून वाढवून सांगितलं जातं. बार्शीतही माझ्यावर हा आरोप केला गेला आहे की मी वेळेत गेले नाही. मात्र तसं नाही मी वेळेत गेले होते. फक्त ते सगळं प्रकरण मी समजून घेईन आणि मगच त्याबाबत बोलेन असंही गौतमीने सांगितलं. तसंच लग्न करण्याचा इतक्यात तरी काही विचार नाही असंही गौतमी पाटीलने स्पष्ट केलंय.