UP Woman Gives Electric Shock To Husband : मोबाइलचे व्यसन ही जगभरातील एक चिंताजनक समस्या बनत चालली आहे. लोक सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाइलवर सर्वाधिक वेळ घालवतात. या मोबाइलमुळेच अनेकदा घरात वाद होतात, नातेसंबंध बिघडतात. पण, या मोबाइलच्या आहारी जाऊन लोक किती धोकादायक पाऊल उचलू शकतात हे दाखवणारी एक घटना सध्या समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये पतीने हातातील मोबाइल हिसकावून घेतल्याने पत्नीला राग आला, यामुळे संतापलेल्या पत्नीने पतीला इलेक्ट्रिक शॉक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नाही तर क्रिकेटच्या बॅटने पती आणि मुलाच्या डोक्यावर हल्ला केला. या घटनेप्रकरणी पीडित पतीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पतीचा दावा आहे की, पत्नी मोबाइलवर जास्त वेळ घालवते. एकदिवस अशीच ती मोबाइलवर होती, त्यावेळी पतीने तिच्या हातून मोबाइल हिसकावला, ज्यावर संतापलेल्या पत्नीने पतीला बेशुद्ध केले आणि त्याला बेडवर बांधले. यानंतर मारहाण करून विजेचे शॉक दिले. घटनेवेळी १४ वर्षांच्या त्यांच्या मुलाने वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पती प्रदीप सिंह यांच्यावर सैफई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

“गर्लफ्रेंड भाड्याने मिळेल, कॉफी डेट १५००, विकेंड डेटसाठी १०,००० रुपये अन्…”; तरुणीची Post व्हायरल, युजर म्हणाले, “लादी, भांड्यासाठी…”

हे प्रकरण किसनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पदमपूर गावातील आहे. येथे प्रदीप कुमार नावाचा व्यक्ती पत्नी बेबी यादवबरोबर राहतो. दोघांच्या लग्नाला जवळपास १७ वर्षे झाली आहेत. त्यांना १४ वर्षांचा मुलगाही आहे. मात्र, लग्नानंतर दोघांमध्ये मोबाइलवरून अनेकदा वाद होत होते.

मोबाइलवरून झाले भांडण

प्रदीपने फिर्यादीत आरोप केला आहे की, त्याची पत्नी रोज कोणत्या ना कोणत्या व्यक्तीशी फोनवर बोलत असे. प्रदीपने यावर आक्षेप घेत तिचे आई-वडील आणि भावाला ही गोष्ट सांगितली. यानंतर पत्नीचा मोबाइल तिच्याकडून काढून घेतला. १८ मे रोजी अशाचप्रकारे मोबाईलवरुन भांडण झाले. या गोष्टीवरून संतापलेल्या पत्नीने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच जेवणात मादक पदार्थ मिसळून पतीला बेशुद्ध केले, पत्नी इतक्यावरच थांबली नाही तिने बेशुद्ध पडलेल्या पतीला विजेचा शॉक दिला. तसेच त्याच्यावर क्रिकेट बॅटने हल्ला केला. या हल्ल्यात पीडित पतीच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या, यावेळी मुलाने मध्यस्ती करत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नीने मुलावरही हल्ला केला. या हल्ल्यात प्रदीप गंभीर जखमी झाला आहे.

पीडित पतीच्या तक्रारीच्या आधारे, पत्नी बेबी विरुद्ध आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), ३२८ (विष किंवा कोणतेही हानिकारक पदार्थ देऊन दुखापत करणे) आणि ५०६ (धमकी देणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आता पुढील तपास सुरू केला आहे.