नेटफ्लिक्सवर २०२१ प्रदर्शित झालेली कोरिअन वेबसिरीज ‘स्क्विड गेम’ प्रंचड गाजली. नुकताच या वेबसिरिजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा ‘स्क्विड गेम’ चर्चेत आला. गरिबी, बेरोजगारी आणि परिस्थितीने लाचार लोकांना पैसे कमावण्याचे अमिष दाखवून या खेळात समाविष्ट केले जाते आणि सुरु होतो जीवघेणा खेळ! या ‘स्क्विड गेम’मध्ये स्पर्धक बालपणीचे खेळ खेळतात पण हारलेलल्या आपला जीव गमवावा लागतो. असा हा चित्तथरारक खेळ पाहताना प्रक्षेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. क्षणोक्षणी पुढे काय घडणार याची आतुरता निर्माण करणाऱ्या या वेबसिरीजला प्रचंड लोकप्रियता मिळाली. वेबसिरीजचा दुसरा भाग प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा ‘स्क्विड गेम’बद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहे. काही लोक भुतकाळात असाच काहीसा प्रकार घडल्याचा दावा करत आहेत तर काही लोक ही वेबसिरीज सत्य घटनेवरून प्रेरित असल्याचे सांगत आहे. दरम्यान पुण्यामध्ये ‘स्क्विड गेम’मधील दाकजी खेळ खेळताना दोन व्यक्ती दिसल्याचा दावा करणारा व्हिडिओ चर्चेत आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी विचित्र अंदाज वर्तवले तर अनेकांनी खिल्ली उडवत मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

दाकजी(Ddakji)हे एक पारंपारिक कोरियन खेळ आहे जे प्रामुख्याने दाकजी चिगी(ddakji chigi) नावाने ओळखल्या जाणाऱ्या खेळाच्या श्रेणीतील विविध प्रकारासाठी वापरले जाते. दाकजी हे सहसा कागदाचे बनलेले असतात आणि खेळा दरम्यान ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे फेकले जातात.

या फ्लिपिंग गेमचा प्रकार लोकप्रिय प्रकार आहे आणि या खेळाला आंतरराष्ट्रीय लोकप्रियता तेव्हा मिळाली जेव्हा २०२१ च्या लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकेत स्क्विड गेम या शोमध्ये हा दाखवण्यात आला होता. अनोळखी लोकांना ‘स्क्विड गेम’मध्ये समाविष्ट करण्यासाठी रिक्रूटर हा खेळताना दिसला होता. जमिनीवर लाल रंगाचे दाकजी पडलेले आहे त्यावर हिरव्या रंगाचे दाकजी फेकून मारत आहे. तीन प्रयत्नात लाल रंगाचे दाकजी पलटले नाही तर रिक्रुटर जिंकेल आणि लाल रंगाचे दाकजी पलटले तर सामान्य व्यक्ती जिंकेल असे वेब सिरीजमध्ये दाखवले आहे. वेबसिरीजमध्ये रिक्रुटरच्या हातात पैशांची बॅग असते. खेळात जिंकल्यानंतर तो समोरच्याला ती बॅग देतो आणि हारल्यानंतर कानाखाली मारतो.

हेही वाचा –“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral

u

हाच सीन पुन्हा चित्रित करण्याचा प्रयत्न व्हिडीओमधील तरुणांनी केला आहे. सिरीजमधील रिक्रूटरप्रमाणे एका व्यक्तीने सुट बूट घातलेला आहे आणि त्याच्यासमोर सामान्य व्यक्ती उभा आहे. दोघेही सिरीजमध्ये दाखवल्याप्रमाणे दाकजी खेळ खेळत आहे. हा सीन चित्रित करताना पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा व्हिडिओ पुण्यातील रेल्वेस्टेशनवर चित्रित केल्याचे दावा केला आहे. व्हिडिओ पाहून काहींनी पुण्यातही ‘स्क्विड गेम’ खेळला जात आहे का अशी शंका व्यक्त केली तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया देत खिल्ली उडवली.

हेही वाचा – दिल्ली मेट्रो तरूणींची केस ओढून मारामारी! जागा दिली नाही म्हणून थेट मांडीवर बसली तरुणी; भांडणाचा Video Viral

एकाने कमेंट केली, पुण्यात जर हा खेळ सुरू झाला तर त्याला मिसळ गेम म्हणावे लागेल.

दुसरा म्हणाला की,”स्विक्ड गेम पुणे एडीशन”

तिसरा म्हणाला की,”सगळे ठीक आहे पण ती पैशांची सुटकेस कुठे आहे”

चौथा म्हणाला, (वेबसिरीजमध्ये ) “तो मेट्रो स्टेशनवर आला होता रेल्वे जंक्शनवर नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाचवा म्हणाला, (वेबसिरीज आणि व्हायरल व्हिडीओमध्ये) महत्त्वाचा फरक हा आहे की व्हिडीओमधील दोघांकडेही पैसे नाही.