Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक पाण्याने नाही तर दारूने अंघोळ करताना दिसत आहे. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. त्यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल. दारू पिण्यासाठी असते, हेच तुम्ही आजवर ऐकले असेल पण तुम्हाला माहिती आहे का, जगात एका ठिकाणी दारूने अंघोळ सुद्धा केली जाते. एका युजरने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत या विषयी माहिती सांगितली आहे.

दारूने केली जाते अंघोळ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर पार्क दिसेल. या व्हिडीओत तुम्हाला अनेक स्वीमिंग पूल दिसतील. नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक स्वीमिंग पूलमधील पाण्याचा रंग वेगवेगळा आहे. अनेक जण या स्वीमिंग पूलमध्ये भरघोस आनंद घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ भारतातील नाही तर जपानचा आहे.

morokokoko या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एका महिलेने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दारूने अंघोळ! जपान टूरदरम्यान मी @yunessun_hakone या अॅम्युजमेंट पार्कला भेट दिली. येथे अनेक वॉटर स्लाइड्स आणि स्वीमिंग पूल होते. या स्वीमिंग पूलमध्ये दारू, शेक. ग्रीन टी,चॉकलेटचे पाणी होते. या पूलमध्ये तुम्ही अंघोळीचा आनंद घेऊ शकता.” याशिवाय या पार्कविषयी इतर सविस्तर माहिती तिने या कॅप्शनमध्ये लिहिली आहे.

हेही वाचा : “छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीने अन्…” मराठमोळ्या नवरीचा उखाणा चर्चेत, VIDEO एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला रेड वाइन हॉट स्प्रिंग सुद्धा दिसेल. एका दारुच्या स्वीमिंग पूलमध्ये जवळपास साडेतीन मीटर लांब मोठी बॉटल आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या पार्कचे कर्मचारी या पूलामध्ये अंघोळ करणाऱ्या लोकांच्या अंगावर बॉटल शिंपडताना दिसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्स हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहे. एका युजरने लिहिलेय, “मला वाटतेय अशी जागा कुठेही नाही” तर एका युजरने लिहिलेय, “मी संपूर्ण पूल पिणार” आणखी एका युजरने लिहिलेय, “यामुळे त्वचेच्या आरोग्यास फायदा होऊ शकतो.”