Peacock Attack On Woman Shocking Video : जंगलात अनेक प्रकारचे पक्षी किलबिलाट करत असतात. पण मोर पक्षी हा सर्वात सुंदर पक्षी म्हणून ओळखला जातो. कारण मोराने पिसारा फुलवल्यावर हिरव्यागार झाडीत निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. मोराचे पंख घेण्यासाठी अनेक जण रानावनात भटकत असतात. मोरीची शिकार करणे आणि या पक्षाच्या जीवाला धोका निर्माण होईल, असं कृत्य केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरंही जावं लागतं. पण एका महिलेनं मोराची अंडीच चोरण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर जे घडलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण मोराची अंडी चोरताना त्या महिलेला चांगलीच अद्दल घडल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

एका डोंगर पायथ्याशी मोर बसलेला असतो. मोराला शांत बसलेलं पाहून एक महिला त्याची अंडी चोरण्याचा प्रयत्न करते, पण त्या मोराच्या शेजारीच दुसरा मोर बसलेला असतो. पण त्या महिलेनं दुसऱ्या महिलेला पाहिलेलं नसतं. महिला अंडी चोरण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरा मोर त्या महिलेवर हल्ला करतो. आपल्या पिसांनी आणि पायाने तो मोर पक्षी त्या महिलेवर हल्ला करतो. त्यानंतर घाबरलेली महिला त्या ठिकाणाहून पळ काढते आणि या झटापटीत त्या मोराची अंडी डोंगरावरून खाली सरपटत जात असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

नक्की वाचा – आता बसणार दणका! महिलांशी चॅटिंग करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी दिला इशारा, ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Motivation4u (@motivation4u__official)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोराचा हा धक्कादायक व्हिडीओ motivation4u_official या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने ६७ हजारांहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मोरांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. मोराची अंडी चोरणाऱ्या माहिलेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही काही नेटकऱ्यांनी केली आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, त्या महिलेचा चांगलाच धडा शिकवण्यात आला. आता ती पुन्हा असं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही.”