Woman Brawling In Five Star Hotel Video Viral : कधी लोकल, तर कधी मेट्रोमधील महिलाच्या मारामारीचे आणि भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या मारामारीचे हे सत्र वाढतानाच दिसत आहे. कधी कुठे एकमेकींचे केस ओढत तर कधी कुठे शिवाशाप देत महिला भांडताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात चक्क एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये काही तरुणी एकमेकांशी जोरदार भांडत, मारामारी करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये तीन तरुणी आपापसात कशावरून तरी एकमेकींशी भांडत आहेत, ज्यात त्या एकमेकींचे केस पडकून कधी चप्पल तर कधी लाथां- बुक्क्यांनी एकमेकांना अक्षरश: लुडवत आहेत.

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील लास वेगासमधील एका लक्झरी हॉटेलमधील आहे. जिथे गेल्या रविवारी एका पार्टीदरम्यान काही तरुणी कोणत्या तरी गोष्टीवरून एकमेकांशी भिडल्याचे दिसत आहे. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यात कोणी एकमेकींचे केस ओढत आहे, तर कोणी चपलेने आणि लाथा बुक्क्यांनी एकमेकांनी मारहाण करत आहेत. पण ही मारामारी कोणत्या कारणामुळे झाली ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन तरुणी एकमेकींशी भांडत आहेत. यात त्या अतिशय हिंसक पद्धतीने मारामारी करताना दिसतात. यात एक तरुणी हातात चपला घेऊन दुसऱ्या तरुणीचे केस ओढून तिला मारताना दिसत आहे. तर मार खाणारी तरुणी दुसऱ्या एका तरुणीचा शर्ट ओढून तिला लाथा- बुक्क्यांनी तुडवत आहे. तरुणींच्या या मारामारीमुळे हॉटेलमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी अनेक लोक तरुणींच्या मारामारीचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, तर काही लोक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.

व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पाहू शकता की, एक माणूस आणि सुरक्षा रक्षकाने मिळून अखेर तरुणींचे हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही या महिलांना ओढत पटकन एकमेकींपासून दूर नेले यामुळे महिलांची ही हिंसक मारामारी काही मिनिटांत थांबली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र तरुणींची ही हाणामारी इतकी वाईट होती की, पोलिसांना हस्तक्षेप करत तिघींना हातकड्या घालाव्या लागल्या. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंट्सद्वारे आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी यावर हसण्याच्या रिअॅक्शन दिल्या आहेत. तर काहींना तरुणींचे हे वागणं अतिशय संतापजनक असल्याचे म्हटले आहे.