Viral Video: गुजरातमधील तरुण रीलच्या शूटदरम्यान थारसह एका पाण्यात अडकल्याची खबर ताजी असतानाच एसयूव्ही थारची आणखीन एक घटना समोर आली आहे. गुरुग्राममध्ये होंडा अमेझने धडक दिल्याने एका महिलेची एसयूव्ही महिंद्रा थार रस्त्याकडेच्या विद्युत खांबाला जाऊन धडकली म्हणा किंवा जवळजवळ त्यावर चढली… हो, तुम्ही बरोबर वाचलेत. हे प्रकरण इतकं नाट्यमय होतं की, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊ या.

व्हायरल व्हिडीओ गुरुग्राममधील आहे. गोल्ड कोर्स रोड एक्स्टेंशनमध्ये दोन वाहनांची जोरदार धडक झाली. आंचल गुप्ता नावाची महिला थार चालवत होती. यादरम्यान एका होंडा अमेझने महिलेच्या थारला धडक दिली. त्यानंतर आंचल गुप्ता यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि थार खांबावर जाऊन चढली. एवढंच नाही तर स्वतःचा बचाव करण्यासाठी महिलेने योग्य वेळी थारमधून उडी मारून सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाली. नाट्यमय प्रकरण व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा.

हेही वाचा…प्रवासादरम्यान टायर पंक्चर; पठ्ठ्याने स्केटिंग बोर्ड लावून असा पळवला टेम्पो की… VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एक अज्ञात प्रवासी गाडीतून जात असतो, तेव्हा एका खांबावर महिंद्रा थार एसयूव्ही चढली आहे अशाप्रकारचे दृश्य दिसते आहे. हे दृश्य पाहताच अज्ञात प्रवासी मोबाइलमध्ये हा अपघात रेकॉर्ड करून घेतो. तसेच सांगण्यात येत आहे की, दुसऱ्या कारमध्ये म्हणजेच होंडा अमेझमध्ये दोन लोक होते; त्यांनी थारला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेले. ही घटना नक्की कोणत्या तारखेला घडली याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ShivrattanDhil1 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये घडलेला प्रसंग थोडक्यात नमूद करण्यात आला आहे. हे प्रकरण घडलं तेव्हा घटनास्थळी जमलेले नागरिकसुद्धा हे दृश्य पाहून थक्क झालेले दिसत आहेत. आज ९ जुलैपर्यंत तरी या प्रकरणातील पोलिस तक्रार आणि तपासाचा कोणताही अहवाल समोर आलेला नाही, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विजेच्या खांबावर थार चढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रिपोस्ट केला जातो आहे.