Woman Jugaad Video: सोशल मीडियावर दर दिवशी असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ आपल्याला थक्कच करणारे असतात, जे आपल्या कायमचे लक्षात राहतात. ‘वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है’ हा ‘स्त्री’ चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग काही रील्स बघितल्यानंतर अनेकदा आठवतो. पण सध्या व्हायरल होणाऱ्या या रीलला हा डायलॉग अगदी साजेसा आहे.

गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात एक महिला अनोखा जुगाड वापरून भांडी घासतेय आणि कपडे धुतेय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. नेमकं काय आहे या व्हिडीओत, जाणून घेऊ या.

हेही वाचा… स्टेजवर महिलेचा डान्स सुरू असताना काकांनी केलं ‘असं’ काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान गाजतोय. या व्हिडीओत एक महिला भांडी घासताना दिसतेय. आता यात काय नवल असं म्हणणारे अनेक असतील. पण नवल हे की, ती भांडी खूप अनोख्या पद्धतीने घासत आहे. साबणाने भांडी घासून झाल्यावर या महिलेने भांडी धुण्यासाठी एक अनोखा जुगाड शोधून काढला आहे.

भांडी चकाचक घासून झाल्यावर ही महिला ज्या पाण्याने भांडी धुतेय ते पाणी तिच्या डोक्यावरून येतंय. म्हणजेच या महिलेने जुगाड म्हणून चक्क डोक्यालाच एक पाईप लावून घेतला आहे. ज्यातून पाणी सतत वाहतंय. डोक्याला एक ओढणी बांधून त्याच्या आतून हा पाईप बाहेर काढला आहे. भांडी घासून झाली की, नळ चालू बंद करायची कटकट न बाळगता ही महिला डोक्यावर लावलेल्या पाईपच्या साहाय्याने भांडी धुताना दिसतेय. भांडी घासून झाल्यानंतर या महिलेने याच पाण्याने कपडेदेखील धुवून काढले.

हेही वाचा… Shopping Trending Topics: शॉपिंग करायचीय, पण ट्रेंडच माहित नाही! गेल्या सात दिवसांत ‘या’ गोष्टी होतायत गुगल ट्रेंडवर सर्च, पाहा यादी

हा व्हिडीओ @kavita_mum या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल ५९.६ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे, म्हणून हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “दिवाळी येतेय, ही चांगली कल्पना आहे”. तर दुसऱ्याने “याला म्हणतात स्मार्ट वर्क” अशी कमेंट केली. एकजण कमेंट करत म्हणाला, “व्वा मॅडम, काय कल्पना आहे.” तर अनेकांनी “जिथे इच्छा तिथे मार्ग”, “ही युक्ती भारताबाहेर गेली नाही पाहिजे”, “या काकींना ऑस्कर मिळायला हवा” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.