सोशल मीडिययावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, मात्र यातील ठराविक व्हिडीओच असे असतात जे नेटकऱ्यांना भावतात. सध्या अशाच एका तरुणीच्या अनोख्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही तिचं कौतुक कराल यात शंका नाही.

खरं तर, सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अनेकदा कष्टकऱ्यांना त्यांच्या कामाचा मोदबदला दिल्याचे किंवा त्यांच्या कामाचे कौतुक केल्याचे व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील तरुणीने एका रिक्षाचालकाते अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत. जे पाहून रिक्षाचालक तर खुश झालाचं पण नेटकरीही तो क्षण पाहून आनंदी झाले आहेत. तर या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.

हेही पाहा- माणुसकीचे दर्शन! दिव्यांग मुलीला रस्ता ओलांडण्यासाठी महिलेने केली अशी मदत, व्हायरल Video पाहून नेटकरीही भारावले

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक तरुणी रिक्षा चालकाचे स्केच काढताना दिसत आहे. हे स्केच ती रिक्षातून प्रवास करताना काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. रिक्षात बसलेल्या तरुणीच्या एका हातात कागद आणि पेन्सिल असल्याचंही दिसत आहे. ड्रायव्हरचे स्केच काढल्याचा व्हिडीओ या तरुणीने आर्ट कार्ट बाय दीक्षा नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. ३ मिनिटांच्या या रिक्षा प्रवासात काढलेले स्केच तिने ज्यावेळी रिक्षा चालकाला दिले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते. शिवाय रिक्षा चालकाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अनेकजण खुश झाले आहेत.

हेही पाहा- “मैत्री नाही, मस्ती नाही…” बॉसची नोटीस वाचताच कर्मचारी संतापला, ऑफिसमधील चुकीच्या गोष्टी केल्या Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ पोस्ट करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “मला माहिती आहे, हे स्केच चांगलं नाही, कारण ते धावत्या रिक्षामध्ये काढलं आहे. हे स्केच मी फक्त रिक्षा चालकाला धन्यवाद देण्यासाठी काढलं होतं, कारण त्याने माझ्यासाठी अशावेळी रिक्षा थांबवली जेव्हा इतर कोणताही रिक्षावाला थांबत नव्हता.” हा व्हिडीओ शेअर केल्यापासून एक मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. शिवाय या तरुणीची स्टाइल नेटकऱ्यांना आवडली आहे. व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले, “किती गोड क्षण आहे.” तर दुसर्‍या एकाने, तुम्ही रिक्षा चालकाच्या चेहऱ्यावर आणलेलं हसू खूप मौल्यवान असल्याचं लिहिलं आहे.