Mahadev Viral Video: श्रावण महिना म्हणजे भक्तीचा आणि महादेवाच्या आराधनेचा पर्वकाळ. देशभरात विविध शिव मंदिरांमध्ये महादेवाच्या जयघोषांनी वातावरण गुंजतंय. अनेक भक्त कावड घेऊन गंगाजल आणतात, उपवास करतात आणि विविध प्रकारे भोलेनाथाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. पण, याचदरम्यान एका महिलेनं महादेवाची पूजा करण्याआधी रील (Reel) काढण्याचा निर्णय घेतला आणि त्या रीलमधूनच तिला मिळालं असं काही की… लोक म्हणू लागले, “यालाच म्हणतात तत्काळ फळ”

श्रावण महिना, महादेवाची पूजा आणि भक्तीचा आवेश पण जरा थांबा… सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ तुफान वेगाने व्हायरल होतोय, ज्यात भक्ती आणि रील्सच्या नशेत हरवलेली एक महिला क्षणात अशा परिस्थितीत सापडते की, पाहणाऱ्यांना हसू आवरत नाही. महादेवाला प्रसन्न करण्याचा तिचा प्रयत्न, एका विचित्र आशीर्वादात कसा बदलतो? व्हिडीओ पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला महादेवाच्या शिवलिंगाजवळ येते. तिच्या हातात पूजेचं साहित्य आहे. पण, पूजेला सुरुवात करण्याआधीच ती रील बनवायला लागते. कॅमेऱ्यात ती स्वतःला टिपण्यासाठी अॅक्शन घेते; मात्र त्याच क्षणी तिचं संतुलन बिघडतं आणि ती थेट मागे घसरत नदीत पडते. या दृश्यामुळे सोशल मीडियावर हशा पिकला आहे आणि लोक म्हणतायत, “महादेवांनी आधी न्हाणं घातलं!”

नेटिझन्सची भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडीओ ट्विटरसारख्या X प्लॅटफॉर्मवर ‘कुंभकरण’ नावाच्या युजरनं शेअर केला आहे. व्हिडीओवर युजर्सनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. कोणीतरी लिहिलं, “शिवलिंग स्पर्श करण्याआधी स्नान करायला हवं होतं.” तर दुसरा म्हणतो, “ही प्रसिद्धीची भूक आणि दिखाव्याची भक्ती… त्यामुळेच भोलेनाथांनी तिला सरळ नदीतच ढकलली.” काहींनी तर थेट यावरून देव अस्तित्वात असल्याचंही म्हणायला सुरुवात केली आहे.

या व्हिडीओमधून एक गोष्ट स्पष्ट होते. भक्ती ही मनापासून हवी; दिखाव्यासाठी नाही. रीलच्या नादात आज अनेक जण स्वतःच्या सुरक्षिततेलाही धक्का देतात. या व्हिडीओने मात्र लोकांना हसवलं जरूर; पण एक गोष्ट शिकवूनही गेला भोलेनाथ कधी, कुठे आणि कसा आशीर्वाद देतील ते सांगता येत नाही.

Video बघा आणि ठरवा हा खरंच आशीर्वाद होता की इशारा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

टीप : हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ आहे. त्यामध्ये केलेल्या दाव्यांची आम्ही पुष्टी करीत नाही. वाचकांनी याकडे संयमानं आणि विवेकानं पाहावं.