Girl Lipstick Mark Video : जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे आवश्यक आहे. आयुष्य म्हणजे प्रत्येक लहान क्षणाचा आनंद लुटणे. प्रत्येक क्षण शेवटचा आहे असे जगणे. काहीवेळा, इतरांना कोणतीही हानी न पोहोचवता केवळ मनोरंजनासाठी विचित्र पद्धतीने वागणे देखील आवश्यक असते. तुम्ही कधी सार्वजनिक ठिकाणी गमतीने वेड्यासारखे वागले आहात का? कधी कुणाची विनाकारण खोड काढल्याचं तुम्हाला आठवतंय का? अनेकांनी आपल्या मित्र मैत्रीणी किंवा अनोळखी लोकांसोबत मज्जा मस्करी, प्रँक केले असतील. अशाच एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुणी असाच आनंद लुटताना दिसतं आहे. पण तिचा हा आनंद इतरांसाठी काय संकट घेऊन आलं असेल त्याची आपण कल्पनाही करु शकणार नाही. ही तरुणी पबमध्ये जे करते ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला पुरुषांच्या पाठीवर किस घेताना दिसत आहे. टी-शर्टच्या मागील बाजूस लिपस्टिकच्या अनेक खुणा दिसत आहेत. ती पुन्हा पुन्हा लिपस्टिक लावून कोणत्याही अनोळखी पुरषाच्या शर्टवर पाठीमागून गुपचूप किस करत लिपस्टिकचे डाग लावत आहे. हे लिपस्टिकचे मार्क म्हणजे पाहणाऱ्याला वाटणार की त्याच्या प्रेयसीने त्याला किस केलं आहे. ती पबमधील अनेक तरुणांसोबत हे करते आणि एकट्यातच हसते. यावेळी पांढऱ्या रंगाचे शर्ट, टी-शर्ट घातलेले पुरुष ती निवडते आणि पुन्हा तेच करते. सर्वजण नाचण्यात व्यस्त असताना एका पबमध्ये ही घटना घडली.

पुरषांचं बायकांनी काय केलं असेल?

बरं, पण या तरुणीच्या अशा वागण्यानं या पुरुषांची घरी काय अवस्था झाली असेल याची कल्पना न केलेलीच बरी, त्यांच्या शर्टावरील लिपस्टिकच्या खुणा पाहून त्या पुरुषांनाही धक्का बसला असेल. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून नेटकरीही यावर कमेंट करत हसत आहेत. यावेळी नेटकऱ्यांनी त्या पुरुषांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – नवऱ्याचं लफडं; बायकोनं ऑफिसमधून पळवत इंजिनिअर नवऱ्याला चपलेने धुतलं, बिहारमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामच्या @chutiyapa_begins_from_here या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत.