पदरात दोन मुलं आणि दारू पिऊन मारहाण करणारा पती अशा अवस्थेत कुठली बाई सापडली की तिच्या दु:खाला अंत राहत नाही. त्यात ती बाई स्वत: कमावती नसेल तर तिला तोंड दाबून हा सगळा त्रास सहन करावा लागतो. पोटच्या पोरांसाठी पतीचे लाथाबुक्के सहन करावे लागतात.

छत्तीसगडमधल्या अंबिकापूर या छोट्या शहरात राहणाऱ्या गीता सिंह अडकली होती. तिचा पती तिला रोज रात्री मारहाण करायचा. घरात येणारे सगळे पैसेही तो त्याच्या दारूसाठी उडवायचा. हा सगळ्या प्रकाराला ती विटली होती. पण मुलांना चांगलं जीवन मिळावे यासाठी ती हे सगळे हाल निमूटपणे सहन करत होती. पण एकेदिवशी तिला हे सगळं असह्य झालं आणि तिच्या मनता आत्महत्या करण्याचे विचार येऊ लागले. त्यावेळी प्रशासनाकडून तिला रिक्षा चालवण्याचं ट्रेनिंग मिळालं आणि उदरनिर्वाहासाठी रिक्षाही मिळाली. आणि सगळ्यात महत्तावाची बाब म्हणजे या रिक्षाची चावी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी तिच्या हाती सोपवली.

वाचा- बांग्लादेशची क्रेझी आंटी

गीता सिंह रिक्षा चालवायला लागल्यावर तिच्या हातात स्वत:च्या हक्काचे पैसे य़ायला लागले. पण या पैशांवरही तिचा नवरा डल्ला मारायला लागला. मारहाण तर रोजची होतीच. पण आता मात्र गीती सिंहची सहनशक्ती संपली होती. तिने तिच्या पतीला सोडून दिलं आणि स्वत:च्या हिमतीवर तिने तिच्या मुलांना वाढवायला सुरूवात केली.
जेव्हा एखादी स्त्री तिच्या स्वत:च्या बळावर काम करते तेव्हा तिला पुरूषी मानसिकतेच्या लोकांकडून अनेक गोष्टी एेकून घ्याव्या लागतात. गीताच्या बाबतीतही तसंच झालं. पण तिने न डगमगता आपला व्यवसाय सुरू ठेवला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह हे अंबिकापूरमध्ये आले असताना त्यानी गीता सिंहच्या रिक्षातून स्वत: प्रवास केल्यावर मात्र या सगळ्यांची बोलतीच बंद झाली.

VIDEO: ‘पुरूषांची कामं कशाला करायची आहेत गं तुला?’

‘मन चंगा तो कठौती में गंगा’ अशी हिंदीत म्हण आहे ती गीतासारख्याच मनाने खंबीर असलेल्या महिलांकडे पाहू न बनवली असावी असंच वाटतं.