Woman Saves Man from Drowning Viral Video: देव तारी त्याला कोण मारी ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. जीवन-मृत्यू कुणाच्याच हातात नाही; पण काही वेळा अशा चमत्कारिक घटना घडतात, ज्यामुळे लोक मरणाच्या दारातून परत येतात. अनेकदा याचा प्रत्यय देणाऱ्या काही घटनाही आपल्याला पाहायला मिळतात. सध्या मृत्यूच्या दारातून परतणाऱ्या एका व्यक्तीचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्या व्हिडीओतील दृश्ये पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही समजेल की, माणूस मृत्यूच्या तोंडातून परत कसा येतो ते.
असे म्हटले जाते की, ज्याच्या नशिबात कोणत्याही परिस्थितीत जगणे लिहिलेले असते, त्याला काहीही होऊ शकत नाही. तो मृत्यूच्या दारातूनही परत येतो. देव नक्कीच त्याचे रक्षण करण्यासाठी कोणीतरी पाठवतो, असेच एकंदरीत त्या घटनेतून दिसून येते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या घटनेत नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊ…
pulloo_meme नावाच्या वापरकर्त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक जण नदीच्या पाण्यात बुडताना दिसत आहे आणि तो नदीच्या प्रवाहात वाहून जात आहे. तो जीवाचा आकांत करून जीव वाचविण्यासाठी धडपडताना दिसतो आहे. तो मदतीसाठी हात पुढे करीत आहे. हा व्हिडीओ पाहून क्षणभरासाठी तुमच्याही अंगावर काटा येईल; पण तेवढ्यात एक महिला त्याच्या मदतीसाठी धावत येताना दिसून आली. नदीकाठावर बांधलेल्या बॅरिकेडिंगच्या बाजूने एक महिला धावत येते आणि त्या बुडणाऱ्या व्यक्तीच्या मदतीसाठी आपली ओढणी नदीत फेकते. तो पुरुष त्या ओढणीला पकडून नदीतून बाहेर येतो. अशा रीतीने त्याचा जीव वाचतो.
या व्हिडीओला खूप खास बनवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे व्हिडीओमध्ये दिसणारी महादेवाची मूर्ती. व्हिडीओमध्ये दिसते आहे की, नदीकाठावर महादेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. त्याच बाजूने एक महिलादेखील मदत करण्यासाठी धावत येते. या व्हिडीओतून हे सर्व दृश्य पाहिल्यावर असे वाटते की, जणू काही देवच बुडणाऱ्या व्यक्तीला मदत करण्यासाठी धावून आला आहे.
येथे पाहा व्हिडीओ
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाला. व्हिडीओ पोस्ट झाल्यापासून लाखो लोकांनी तो पाहिला आहे. १४ लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी व्हिडीओला लाईक केले आहे. व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक महिलेचे कौतुक करताना दिसत आहेत. ते सोशल मीडियावर या दैवी चमत्कार वाटणाऱ्या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करतानाही दिसत आहेत.