Viral video: आज कालची तरुण पिढी फार बिंधास्त जगते, ते कधीही कुठेही काहीही करू शकतात. अन् त्यात जर का मुलं जन्मत:च खट्याळ असतील तर मग काय विचारायलाच नको. अशी मुलं आई-वडिलांची सुद्धा फिरकी घ्यायला मागे पुढे पाहात नाहीत. अशाच एका खोडकर मुलाचाव्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलानं त्याच्या आईसोबत काही प्रँक केलाय की ज्या बद्दल त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. बरं, या प्रँक नंतर आईने ज्या काही प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहून खरंच तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही. हा व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा पाहाच.

एका मुलाने आपल्या आईला तिच्या वाढदिवशी असं सरप्राईज गिफ्ट दिलं की, ते पाहून तिला मोठा धक्काच बसला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेचं डोळे बंद आहेत आणि जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिला तिच्या समोर एक मोठा बॉक्स दिसला. तिला वाटलं की बॉक्समध्ये काहीतरी विशेष असेल, म्हणून ती उत्सुकतेने बॉक्सकडे पाहते आणि नंतर तिच्या मुलाच्या सांगण्यावरुन तो बॉक्स उघडते. परंतु तो बॉक्स उघडताच ती घाबरते आणि तिथून पळून जाते. कारण त्या बॉक्समध्ये गिफ्ट नसून चक्क साप आहे. अचानक हा साप पाहून महिलेचा थरकार उडला आणि ती त्याठिकाणाहून लांब झाली. त्यानंतर ती तिच्या मुलाला विचारते आहे की खरा आहे का खरा आहे का. यावर तो तरुण आईची अवस्था पाहून हसत आहे.

सुरुवातीला तुम्ही पाहिल तर तुम्हाला कळेल त्याची आई फारच उत्सुक दिसत आहे, मात्र बॉक्स उघडल्यानंतर तिची चांगलीच अवस्था खराब झाली. यानंतर असं करु नकोस परत असं ती तरुणाा सांगत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: अतिशहाणपणा नडला! तरुणीनं चक्क डोळ्यात पिळलं लिंबू अन्…कॅमेऱ्यासमोरच भयंकर शेवट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ brotherofcolor या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा प्रँक पाहून अनेकांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. . आता हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे की नाही हे तर देवच जाणो, पण व्हिडीओ गंमतीशीर आहे हे मात्र नक्की. असो, हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला? किंवा असा काही प्रकार तुमच्यासोबत कधी घडलाय का? आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या.