Woman Seen Sleeping on The Metro Floor : दर काही दिवसांनी मेट्रो रेल्वेसंदर्भात काही ना काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात दिल्ली मेट्रो आघाडीवर आहे. दिल्ली मेट्रोत कधी कुणी सीटसाठी भांडताना दिसतो; तर तर कधी कोण सीट रिकामी करण्यासाठी विचित्र गोष्टी करताना दिसतात. काही व्हिडीओंमध्ये जोडपी प्रवाशांसमोर अश्लील कृत्य करताना दिसतात. हे सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. अशातच एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एका महिलेने बसण्यासाठी सीट न मिळाल्याने असे काही केले, जे पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

जेव्हा तुम्ही मेट्रोमधून प्रवास करता तेव्हा तुम्ही पाहिले असेल की, मेट्रोमध्ये खाली जमिनीवर बसण्यास परवानगी नाही. मेट्रोच्या डब्यांमध्ये स्टिकर्स लावून लोकांना नियमांबद्दल माहिती दिली जाते. त्यामुळे बरेच लोक जमिनीवर न बसता, उभे राहून प्रवास करतात. पण, सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एक महिला मेट्रोमध्ये चादर अंथरून चक्क आरामात झोपून प्रवास करतेय. इतर प्रवासी उभे असताना ही महिला मात्र पाच ते सहा प्रवाशांची जागा अडवून झोपली आहे. त्यामुळे अनेकांनी या महिलेच्या वागण्यावर टीका केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्रामवर @masala_soddha नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले- माझ्यासमोर कधी अशा काही घटना का घडत नाहीत? आणखी एका युजरने लिहिले- ही मेट्रो नसून स्लीपर कोच आहे. तिसऱ्या युजरने लिहिले- काकी असा विचार करीत असतील की, त्या बसू तर शकत नाहीत; पण झोपू शकतात. आणखी एका युजरने लिहिले- काही खूप डाउन टू अर्थ आहेत.