IPL 2025 Viral Poster: गेल्या १८ वर्षांत आयपीएलने लोकांचे खूप मनोरंजन केले आहे. या काळात या लीगमध्ये अनेक दिग्गज खेळाडू दिसले आणि असे विक्रम झाले, ज्यांचा कोणी विचारही केला नव्हता. तथापि, या सर्वांमध्ये एक संघ आहे जो आजपर्यंत आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकलेला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीने आजपर्यंत आयपीएल जिंकलेले नाही. दरम्यान, नऊ वर्षांनी पंजाब किंग्जला हरवून आरसीबी संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ मध्ये क्वालिफायर-१ मध्ये पंजाब किंग्जचा ८ विकेट्सने पराभव केला आणि थेट अंतिम फेरीत धडक मारली. त्यानंतर आता आरसीबीचे चाहते आयपीएल ट्रॉफीची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, स्टेडियममधून एक विचित्र आणि धक्कादायक पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर आयपीएलशी संबंधित अनेक व्हिडीओ फोटो व्हायरल होत असतात. आयपीएलच्या सामन्यांमधील खास क्षण, खेळाडूंच्या कामगिरीचे उत्कृष्ट प्रदर्शन, तसेच सामन्यादरम्यानचे विविध मनोरंजक असे मजेदार क्षण, खेळाडू आणि चाहत्यांमधील संवाद किंवा इतर अनपेक्षित घटनांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. सध्या IPL दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गुरुवारी चंडीगड येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान, एका भन्नाट फॅनचा फोटो समोर आला आहे. नेमकं घडलं काय जाणून घेऊया…

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतर उत्साहाच्या भरात एका क्रिकेटप्रेमी महिलेने चक्क आपल्या पतीला घटस्फोट देण्याची धमकी दिली आहे. लाल साडी परिधान केलेल्या या महिलेचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आरसीबीच्या या महिला चाहतीने हातात पिवळ्या रंगाचे पोस्टर धरले आहे, ज्यावर स्पष्ट अक्षरात लिहिले आहे की, “जर आरसीबीने अंतिम सामना जिंकला नाही तर मी माझ्या पतीला घटस्फोट देईन…” याबरोबरच महिलेने खाली विराट कोहलीचे नावही लिहिले आहे. आता या महिलेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरत आहेत. आरसीबीचे चाहते ते सर्वाधिक शेअर करत आहेत आणि म्हणत आहेत की “आता आरसीबीला अंतिम सामना जिंकायचाच आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा पोस्टर

हा फोटो पाहिल्यानंतर लोकांनीही जोरदार कमेंट करायला सुरुवात केली आहे. लोक म्हणत आहेत की, “हा फोटो पाहून पतीची काय अवस्था झाली असेल.” एका युजरने लिहिले की, “आता तिच्या नवऱ्याला मैदानात उतरावे लागेल.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “मॅडम, तुम्ही पेपर तयार ठेवा…” तिसऱ्या युजरने लिहिले की, “कोहली भाऊ, तुमच्या चाहत्याचे घर तुटण्यापासून वाचवा.”, अशाप्रकारच्या भन्नाट प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.